तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबादमधील एका रुग्णालयात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तत्काळ अन्य ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आगी लागली तेव्हा रुग्णालयात १५ रुग्ण व रुग्णालयात स्टाफ होता. तत्काळ बचावकार्य सुरू केल्याने सर्वांना सुरक्षित अन्य ठिकाणी हलवण्यात आले.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता -
आगीची ही घटना हैदराबाद शहरातील अंकुर रुग्णालयात शनिवारी झाली. रुग्णालय व्यवस्थानाने म्हटले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार रुग्णालयाच्या टेरेसवर शॉर्ट सर्किट झाल्याने आग भडकली व रुग्णालयाच्या आतपर्यंत पोहोचली. फायर डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी आग लागली तेव्हा १५ रग्ण उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.
आग इतकी भीषण होती की, आगचे लोट दुरवरून दिसत होते. आगीच्या ज्वाला पाहून याची सूचना तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. सूचना मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. रुग्णालयाने सांगितले की, आपला स्टाफ व रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.
संबंधित बातम्या