संपत्तीच्या वादातून इंजिनीअर पत्नीनं केली पतीची हत्या! मृतदेह ८०० किमी अंतरावर नेऊन जाळला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  संपत्तीच्या वादातून इंजिनीअर पत्नीनं केली पतीची हत्या! मृतदेह ८०० किमी अंतरावर नेऊन जाळला

संपत्तीच्या वादातून इंजिनीअर पत्नीनं केली पतीची हत्या! मृतदेह ८०० किमी अंतरावर नेऊन जाळला

Oct 28, 2024 08:52 AM IST

telangana businessman murder case : व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या पत्नीने संपत्तीत वाटा न दिल्याने आपल्या पतीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. तेलंगणा येथील हायप्रोफाइल मर्डर केस सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

आठ कोटींची संपत्ती न दिल्याने इंजिनियर पत्नीनं केली पतीची हत्या! ८०० किमी अंतरावर मृतदेह नेत जाळला
आठ कोटींची संपत्ती न दिल्याने इंजिनियर पत्नीनं केली पतीची हत्या! ८०० किमी अंतरावर मृतदेह नेत जाळला

telangana businessman murder case : तेलंगणातील एका बड्या व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा कर्नाटक पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या पत्नीसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतून तब्बल ८०० किमी अंतरावर पतीचा मृतदेह नेत जाळला. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

रमेश (वाय ५४) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर निहारिका (वय २९) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. निहारीकाने ८ कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी आपल्या पतीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी डॉ. निखिल आणि अंकुर राणा या तिच्या दोन साथीदारांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोडगू जिल्ह्यातील एका कॉफी इस्टेटमध्ये रमेश यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कोडगू पोलिसांनी रमेशच्या वैयक्तिक संबंधांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तेलंगणा येथील पोलिस अधिकाऱ्यांशी कर्नाटक पोलिसांनी संपर्क साधला. जसजसा तपास पुढे जात गेला तसतसा निहारिका, डॉ. निखिल आणि अंकिर राणा यांच्यावर संशय वाढत गेला. पोलिसांनी निहारिकाची चौकशी केली असता तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपी महिला उच्च शिक्षित इंजिनीअर

व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या २९ वर्षीय निहारिकाने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये काम करत असताना एका घोटाळ्यात तिचं नाव समोर आलं होतं, ज्यामुळे तिला अटकही करण्यात आली होती. सुटकेनंतर ती बेंगळुरूला परतली आणि २०१८ मध्ये रमेशशी लग्न केले. यानंतर रमेश आपल्या महागड्या जीवनशैलीवर पैसे खर्च करत राहिला. निहारीकाला त्याच्या संपत्तीत वाटा हवा होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. निहारिकाने रमेशला ८ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास रमेशने नकार दिल्याने हे प्रकरण चिघळले. यामुळे निहारिकाने तिच्या साथीदारांच्या मदतीने रमेशची हत्या करण्याचे ठरवले.

असा रचला हत्येचा कट

रमेशने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापल्यानंतर निहारिकाने अंकुरला भेटण्याचा बेत आखला. त्याने रमेशला हैदराबादमधील उप्पल येथे बोलावून त्याचा गळा दाबून खून केला. निहारिक आणि त्याच्या साथीदारांनी मृतदेह ८४० किलोमीटर दूर कोडागू येथे नेला. त्यानंतर त्यांनी रमेशचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून कॉफीच्या बागेत आग लावली. विशेष म्हणजे रमेश बेपत्ता असल्याची तक्रारही निहारिकाने दाखल केली होती.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर