लोक अनेकदा नकळत अशा चुका करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. अशीच एक घटना चीनच्या शांघायमधून समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या आईचे मौल्यवान दागिने चोरून अवघ्या ६० युआन (सुमारे ७०० रुपये) मध्ये विकले. ज्यामुळे ही ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. या दागिन्यांची खरी किंमत १ मिलियन युआन (सुमारे १ कोटी १९ लाख रुपये) इतकी होती. लिप स्टड विकत घेण्यासाठी मुलीने हे दागिने ७०० रुपयांत विकले.
घरातून मौल्यवान दागिने गायब झाल्याचे मुलीची आई वांग यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वैतागलेल्या वांग यांनी तात्काळ पुतुओ पब्लिक सिक्युरिटी ब्युरोअंतर्गत वानली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीने काही पैशांसाठी आईचे दागिने विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुलीने चोरलेल्या दागिन्यांमध्ये जेड ब्रेसलेट, हार आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेल्या इतर वस्तुंचा समावेश आहे.
संबंधित मुलीने हे दागिने बनावट समजले आणि स्थानिक बाजारपेठेतील जेड रिसायकलिंगच्या दुकानात विकले. वांग यांनी पोलिसांना सांगितले की, 'मी तिला दागिने का विकले? असे विचारले आणि तिने सांगितले की, त्या दिवशी तिला पैशांची गरज होते. मी तिला किती पैसे आणि कशासाठी हवे आहेत, असे विचारले. तर, तिने सांगितले की, मी एका मुलीच्या ओठावर पाहिलेले लीप स्टड मला हवे होते.
पोलिस अधिकारी फॅन गावजिये यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेऊन मार्केट व्यवस्थापनाशी समन्वय साधला. त्या दिवशी दुकानमालक बाहेर होता, पण आम्ही त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि पुढील कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात बोलावले. नंतर हे दागिने शोधण्यात यश आले. मुलीने विकलेले दागिने वांग ला परत मिळाले.
संबंधित बातम्या