खळबळजनक! बोगस डॉक्टरनं युट्युब व्हिडिओ पाहून केली शस्त्रक्रिया! मुलाचा मृत्यू-teen dies after fake doctor conducts surgery using youtube tutorial in bihar saran report ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! बोगस डॉक्टरनं युट्युब व्हिडिओ पाहून केली शस्त्रक्रिया! मुलाचा मृत्यू

खळबळजनक! बोगस डॉक्टरनं युट्युब व्हिडिओ पाहून केली शस्त्रक्रिया! मुलाचा मृत्यू

Sep 09, 2024 10:08 AM IST

Bihar Saran fake doctor : बिहार राज्यातील सारण जिल्ह्यात येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बोगस डॉक्टरने यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून शस्त्रक्रिया केली.

 बोगस डॉक्टरंन युट्युब व्हिडिओ पाहून केली शस्त्रक्रिया! तरुणाचा मृत्यू
बोगस डॉक्टरंन युट्युब व्हिडिओ पाहून केली शस्त्रक्रिया! तरुणाचा मृत्यू

Bihar Saran fake doctor : बिहारमधील सारण जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका बोगस डॉक्टरने युट्युबवर व्हिडिओ पाहून पित्ताशयातील दगड काढण्यासाठी शस्त्रक्रिया केल्यानं एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला अनेकदा उलट्या झाल्याने त्यांनी मुलाला सारणयेथील गणपती रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्या संमतीशिवाय मुलांवर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कृष्ण कुमार असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहे. तर अजित कुमार पुरी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, 'बनावट' डॉक्टर अजितकुमार पुरी यांच्याकडे का नेले, असे प्रश्न पालकांना विचारला असता, ते म्हणाले, ' मुलाला खूप त्रास होत होता. त्याला उलट्या होत असल्याने त्याला लवकर उपचार मिळावे या साठी आम्ही पुरी यांच्या दवाखान्यात गेलो. या ठिकाणी त्याने आमच्या संमतीशिवाय मुलावर शस्त्रक्रिया केली.

काय आहे प्रकरण ?

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गणपती सेवा सदनातील बोगस डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. नर्सिंग होममधील कर्मचारी गायब झाल्याने इतर रुग्णांना सोडून देण्यात आले आहे.

कृष्णा कुमारच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कृष्णाला खूप उलट्या झाल्याने त्यांनी त्याला सारणच्या गणपती रुग्णालयात नेले. प्रकृती खालावल्याने 'डॉक्टर'ने त्यांना पाटण्यातील रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. आम्ही त्याला दाखल केलं आणि थोड्याच वेळात उलट्या थांबल्या. पण डॉक्टर अजितकुमार पुरी यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले. युट्युबवरील व्हिडिओ पाहून त्यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली, यानंतर आमच्या मुलाचा मृत्यू झाला,' असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात नेत असताना मुलाचा मृत्यू झाला आणि 'डॉक्टर'ने व इतर कर्मचाऱ्यांनी इतरांसह त्याचा मृतदेह रुग्णालयात सोडून फरार झाले. हा डॉक्टर बोगस असल्याचा संशय कृष्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कृष्णकुमारयांचे आजोबा प्रल्हाद प्रसाद शॉ यांनी सांगितले की, उलट्या थांबल्यानंतर मुलामध्ये सुधारणा होताना दिसत होत्या. पण डॉक्टरांनी वडिलांना कामानिमित्त पाठवले आणि घरच्यांच्या संमतीशिवाय मुलावर शस्त्रक्रिया सुरू केली. मुलाला वेदना होत होत्या. जेव्हा आम्ही डॉक्टरांना विचारले की मुलाला वेदना का होत आहेत, तेव्हा त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि विचारले की तुम्ही डॉक्टर आहात का? मात्र, संध्याकाळी मुलाचा मृत्यू झाला. त्याला (सीपीआरसह) देऊन उपचार करण्यात आले. यानंतर त्याला पाटण्याला नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून आरोपी डॉक्टर आणि कर्मचारी फरार झाले.

मुंबईत बोगस डॉक्टर'ला अटक

मुंबईतील मालवणी येथे पत्नीच्या बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (बीयूएमएस) पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी वांद्रे येथील रहिवासी परवेझ अब्दुल अजीज शेख (वय ४६) याला पोलिसांनी मार्च महिन्यात अटक केली होती. माहितीनंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मालाडच्या पी नॉर्थ वॉर्डच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांनी शेख यांच्या मालवणी क्लिनिकची अचानक तपासणी केली. शेख याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्टच्या संबंधित कलमान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख मुलुंडमधील एका वेगळ्या प्रकरणातही हवा होता. त्याने २०२३ मध्ये त्याने केलेय चुकीच्या उपचारांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शेख याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग