What Is No- Shampoo Trend: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड व्हायरल होत असतात. सध्या किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये नो-शॅम्पू हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. मात्र, हा ट्रेंड किती धोकादायक आणि हानिकारक ठरू शकतो, याबाबत तज्ज्ञांनी भिती व्यक्त केली आहे. टीक टॉकच्या या नव्या ट्रेंडबाबत जाणून घेऊयात.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉकवर अनेक किशोरवयीन मुले आणि तरुणांनी नो शॅम्पू ट्रेंडचा प्रचार केला आहे. या ट्रेन्डमुळेकेसांची गुणवत्ता सुधारल्याचा दावा अनेकांनी केला आहे. परंतु, तज्ज्ञांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या ट्रेंडमध्ये फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे.
'नो-शॅम्पू' हा असा ट्रेन्ड आहे, जिथे लोक केस धुण्यासाठी कोणत्याही शॅम्पूचा वापर करत नाहीत. केस धुण्यासाठी फक्त पाण्याचा वापर केला जातो. मात्र, हा ट्रेन्ड किती धोकादायक ठरू शकतो याबाबत तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. या ट्रेंडमुळे कोंडा, केसांची वाढ खुंटणे, टाळूमध्ये जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांनी या ट्रेंडचे हानिकारक परिणाम समजावून सांगितले आहेत. या ट्रेंडमुळे टाळूला खाज सुटणे आणि मुळापासून केस तुटतात. तसेच केस तितक्या कार्यक्षमतेने वाढत नाहीत. टाळू योग्यरित्या स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू न वापरल्याने जळजळ आणि फ्लॅक्सिनेस होऊ शकते. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी अँटी डँड्रफ शॅम्पूची आवश्यकता असते. टाळूची योग्य प्रकारे स्वच्छता न केल्यास मायक्रोबायोम किंवा टाळूवर राहणारे बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कोंडा वाढतो, ज्यामुळे टाळूशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
संबंधित बातम्या