नोयडातील १५ कोटी रुपयांच्या फ्लॅटची नेटकऱ्यांना भुरळ; अभियंत्याने सोशल मिडियावर टाकलेला व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नोयडातील १५ कोटी रुपयांच्या फ्लॅटची नेटकऱ्यांना भुरळ; अभियंत्याने सोशल मिडियावर टाकलेला व्हिडिओ व्हायरल

नोयडातील १५ कोटी रुपयांच्या फ्लॅटची नेटकऱ्यांना भुरळ; अभियंत्याने सोशल मिडियावर टाकलेला व्हिडिओ व्हायरल

Jun 26, 2024 09:19 AM IST

Noida 15 crore rs flat viral video : नोयडा येथे एका अभियंत्रयाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात १५ कोटी रुपयांचा फ्लॅटचा विडियो शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नोयडातील १५ कोटी रुपयांच्या फ्लॅटची नेटकऱ्यांना भुरळ; अभियंत्याने सोशल मिडियावर टाकलेला व्हिडिओ व्हायरल
नोयडातील १५ कोटी रुपयांच्या फ्लॅटची नेटकऱ्यांना भुरळ; अभियंत्याने सोशल मिडियावर टाकलेला व्हिडिओ व्हायरल (atsknightsbridge.com)

Noida 15 crore rs flat viral video : नोयडा येथे एका अभियंत्रयाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात १५ कोटी रुपयांचा फ्लॅटचा विडियो शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे घर नेटकऱ्यांना आवडले आहे. आता त्यांना हा फ्लॅट कोण खरेदी करणार या बाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

दिल्ली एनसीआरमधील एका अभियंत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नोएडामधील बांधकाम सुरू असलेल्या एक अपार्टमेंट १५ कोटींना विकले गेले असल्याचे त्यानं म्हटलं आहे. “विटी इंजिनियर” या त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने हा विडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे. हा व्हिडीओ शेअर करतांना रिअल इस्टेटच्या धक्कादायक किमतीवर देखील त्याने प्रकाश टाकला आहे. व्हिडिओत त्यानं म्हटलं आहे की, आपण कितीही नोकऱ्या बदलल्या तरीही हे घर घेणे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे.

छिब्बर असे या अभियंत्याचे नाव असून त्यानं त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सना नोएडा सेक्टर १२४ मध्ये सयरी असलेल्या एटीएस नाइट्सब्रिज डेव्हलपमेंटमध्ये अपार्टमेंटचा व्हिडिओ दाखवला. यावेळी त्याने “तुम्ही इथल्या अपार्टमेंटची किंमतीचा अंदाज लावू शकता का असा सवाल देखील नेटकऱ्यांना केला. हे सांगताना त्याने या अपार्टमेंटच्या किमिती देखील सांगितल्या. फोर बीएएचके साठी १५ कोटी तर सहा बिचकेसाठी २५ कोटी रुपये किंमत असल्याचे त्याने व्हिडिओत संगीतळे आहे. तसेच हे हे अपार्टमेंट्स कुणी विकत घेतले ? याचा प्रश्न देखिल पडत असल्याचे त्याने म्हटले आहे. या सोबतच हा फ्लॅट घेणारा व्यक्ती काय काम करत असेल असा प्रश्नदेखील त्याने विचारला आहे. 'मी कितीही नोकऱ्या बदलल्या, मी कितीही व्यापार केला किंवा गुंतवणूक केली तरी मला हा फ्लॅट घेणे परवडेल का?" असा प्रश्न देखील त्याने विचारला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून, छिब्बरचा व्हिडिओ ४.३ दशलक्ष व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. एटीएस नाइट्सब्रिजमधील अपार्टमेंटच्या किमती नोएडा अपार्टमेंटच्या ठराविक किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहेत हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर देखील अनेकांनी पाहिला आहे.

अनेक एक्स वापरकर्त्यांनी सांगितले की नोएडाची रिअल इस्टेटच्या किमती या दिल्ली प्रमाणे वाढल्या आहेत. मध्यमवर्गीय भारतीयांच्या आवाक्याबाहेर ही रक्कम असून या किमितीत दुबईतील व्हिला खरेदी करू शकता, अशी कमेन्ट त्याने दिली आहे.

एका नेटकाऱ्याने आयफेल टॉवरच्या बाजूला असलेल्या पॅरिस अपार्टमेंटचे फोटो शेअर केले. हा व्हीला देखील १५ कोटी रकमेत खरेदी करू शकता असे त्यानं म्हटलं आहे.

तर एका एक्स युजरने लिहिले की, नोएडातील फ्लॅटसाठी १.७ मिलियन डॉलर खर्च करणे म्हणजे वेडेपणाचे लक्षण आहेत.

"हा सामान्य प्रकल्प नाही, लक्झरी प्रोजेक्ट आहे आणि म्हणूनच एवढ्या किंमती आहेत. थ्री बीएचके ६००० चौरस फुटांचा आहे. ६ बीएचके १०००० चौरस फूट आहे. त्यामध्ये डेडिकेटेड शंखकाराप्रमाणे सोयीसुविधाही असतील,' असे एक्स युजर श्वेतांशू मेहता यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर