पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! 'या' देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! 'या' देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा

पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! 'या' देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा

Dec 17, 2024 10:51 AM IST

Viral news : भारता शेजारील राष्ट्र म्यानमारमध्ये सध्या बिकट परिस्थिती आहे. या देशात सुशिक्षित महिलांवर पैशांसाठी शरीर विकण्याची वेळ आली आहे.

पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! 'या' देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा
पैशांसाठी महिला शिक्षक, डॉक्टरांना करावी लागत आहे देहविक्री ! 'या' देशात सुशिक्षित महिलांची होतेय दुर्दशा

Viral news : भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये अशिक्षित महिलांसह सुशिक्षित महिलांची स्थिती देखील बिकट झाली आहे.  डॉक्टरांपासून शिक्षकांपर्यंत अनेक महिलांना आता घर चालवण्यासाठी देह विकावा लागत आहे. आधीच कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या देशात लष्करी राजवटीमुळे राजकीय अस्तिर वातावरण आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने म्यानमारची सत्ता काबीज केली होती.

म्यानमार मधील आर्थिक संकट आणि राजकीय परिस्थितीमुळे येथील नागरिकांची विशेषत: महिलांची स्थिती ही बिकट झाली आहे. या बाबत  न्यूयॉर्क टाइम्समध्ये सविस्तर वृत्त देण्यात आले आहे. एका महिलेले नाव न छापण्याच्या अटीवर देशातील महिलांची बिकट परिस्थित कथन केली आहे.  कोव्हिडनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या. त्यात  लष्कराने सत्ता काबीज केली. परिणामी,  त्यांचे  मासिक वेतन ४१५ डॉलरवरुन  कमी झाले आहे. त्यात वडील मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्या आजारवर देखील त्यांना उपचार करावे लागले. यामुळे सुशिक्षित असतांना देखील या महिलेला देहविक्री करावी लागत आहे. गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून ही महिला  देहव्यापारात आहे.

देहविक्री करण्याची वेळ 

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या महिलेने सांगितले की, ती सुशिक्षित असतांना देखील तिला काम मिळत नव्हते. दरम्यान, तिच्यापेक्षा जास्त कमाई करणाऱ्या 'डेट गर्ल्स'बद्दल तिला माहिती मिळाली. या तरुणी  सेक्सवर्कर असून यात डॉक्टर व शिक्षक महिलांचा समावेश आहे. या तरुणींना वर्षानुवर्षे अभ्यास करून देखील  आता उदरनिर्वाहासाठी त्यांना देहविक्री करावी लागत असल्याचं या महिलेने सांगितले.  

रिपोर्टनुसार, डॉक्टर, शिक्षक, परिचारिका तसेच विविध सुशिक्षित  महिला या सेक्स वर्कर बनल्या आहेत. या महिलांचा स्पष्ट आकडा मिळणे अवघड असले तरी रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती आहे.  सुशिक्षित स्त्रिया उपजीविकेसाठी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवत आहेत.

२०२६ सालापर्यंत वस्त्रोद्योग कारखान्यांमध्ये १६ लाख महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे कारखाने अनेक ग्रामीण महिलांना रोजगार देत होते.  मात्र, बंडखोरीनंतर आता अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर इतर कंपन्या या म्यानमारमधून बाहेर पडल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर