Mobile Blast: खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mobile Blast: खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी

Mobile Blast: खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू, शेजारी बसलेला नातेवाईकही जखमी

Dec 07, 2024 11:05 AM IST

Gondia Teacher Dead After SmartPhone Blast: गोंदियात खिशातील स्मार्टफोनचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू
खिशात मोबाईलचा स्फोट, गोंदियातील शिक्षकाचा जागीच मृत्यू

SmartPhone Explode News: गोंदिया जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली. खिशात ठेवलेल्या मोबाईचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या शेजारी बसलेले नातेवाईकही जखमी झाले आहेत. त्यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध येथे गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

सुरेश संग्रामे (वय, ५५) असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. तर, नत्थु गायकवाड (वय, ५६) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही डारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुरेश आणि नत्थु हे गुरुवारी संध्याकाळी नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी जात असताना सुरेश यांच्या खिशात असलेल्या फोनचा अचानत स्फोट झाला. या घटनेत सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर, नत्थु हे गंभीर जखमी झाले. नत्थु यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्मार्टफोनमध्ये स्फोट होण्यामागची कारणे

फोनचा स्फोट होण्याची मुख्य करण असली तरी बॅटरीमध्ये अनेकदा बिघाड होत असतो. लिथियम-आयन बॅटरी, जी बर्याचदा मोबाइल फोनमध्ये वापरली जाते, एक सकारात्मक टर्मिनल, एक नकारात्मक टर्मिनल (कॅथोड आणि अॅनोड) आणि एक इलेक्ट्रोलाइट असते. बॅटरीममध्ये काही खराबी आल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. ज्यामुळे आयन थेट कॅथोड आणि अॅनोडदरम्यान जाते. त्यामुळे बॅटरीच्या आतील तापमान आणि दाब वाढतो. ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.

स्मार्टफोनमध्ये स्फोट होण्याआधी दिसणारी लक्षणे?

१) तुमच्या फोनची बॅटरी फुगलेली दिसत असेल तर, त्याचा अर्थ असा आहे की, बॅटरी खराब झाली लवकरात लवकर ती बदलून घ्यावे.

२) चार्जिंग करताना तुमचा फोन प्रमाणापेक्षा जास्त गरम झाला तर फोनमधील बॅटरी खराब झाली आहे आणि शक्य तितक्या लवकर फोनमध्ये बॅटरी बदलून घ्यावी.

३) जर तुम्हाला तुमच्या फोनमधून आवाज ऐकू येत असतील तर, ते बॅटरीच्या समस्येचे लक्षण असू शकते. बॅटरीतून गॅस लीक झाल्याने असे होऊ शकते.

४) जर तुमचा फोन अनपेक्षितपणे बंद होत असेल, विशेषत: जर असे वारंवार होत असेल तर ते बॅटरी डेड झाल्याचे लक्षण असू शकते.

५) जर आपल्या स्मार्टफोनला काहीतरी जळत असल्याचा वास येत असेल तर हे काहीतरी वाईट घडणार असल्याचे निश्चित लक्षण आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर