Gujarat Suicide News : पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून बंगरुळू येथे अतुल सुभाष याने आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतांना दिल्ली येथे देखील एका व्यावसायिक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये एका पत्नी पीडित व्यक्तीने व्हिडिओ बनवून त्याचं जिवन संपवलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या आत्महत्येसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरले आहे. या व्हिडिओत पत्नीला धडा शिकवण्यास त्याने कुटुंबीयांना सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुजरातमधील बोटाड जिल्ह्यात जमराळा गावात ही घटना घडली आहे. सुरेश सदाडिया (वय ३९) असे आत्मतहत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ३० डिसेंबर रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ तयार करत पत्नीवर कारवाईची मागणी केली होती.
बोटाड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुटुंबीयांना सुरेशच्या मोबाइलवरून मृत्यूपूर्वी व्हिडिओ सापडला आहे. यात त्याने त्याच्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरले आहे. या व्हिडिओत पत्नीला धडा शिकवण्याची विनंती त्याने घरच्यांना केली आहे.
सुरेशच्या वडिलांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेशची पत्नी जयाबेन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांची सून सतत मुलाचा मानसिक छळ करत असे. ती त्याच्याशी वारंवार भांडत करत असे. तसेच वाद करून आई-वडिलांच्या घरी जात असे. एफआयआरनुसार, सुरेशने सासरच्या घरी जाऊन पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पत्नीने परत येण्यास नकार दिला. यानंतर सुरेशने हे टोकाचे पाऊल उचलले.
काही दिवसांपूर्वी अभियंता अतुल सुभाष या अभियंत्याने देखील पत्नीने व सासरच्या मंडळीने केलेल्या छळामुळे अतुलने आत्मतहत्या केली होती. या प्रकरणी पत्नी निकिता, सासू निशा आणि पत्नीचा भाऊ अनुराग यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि पैसे उकळल्याचा आरोप करत व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये आत्महत्येचं संपूर्ण कारण सांगण्यात आलं आहे. या नंतर ल्लीत पुनिता खुराणा याने देखील पत्नीच्या त्रासाला कंटाळून जिवन संपवलं होतं. त्याने देखील व्हिडिओ शेअर करत त्याची व्यथा मांडली होती. पुनीतने ५९ मिनिटांचा व्हिडिओ बनवून पत्नी आणि सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.
संबंधित बातम्या