तेलगू देसम पक्षातून (टीडीपी) पहिल्यांदाच खासदार झालेले चंद्रशेखर पेम्मासानी (chandra sekhar pemmasani) मोदी ३.० मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पेम्मासानी यांनी गुंटूर मतदारसंघातून वाईएसआरसीपी पक्षाचे किल्लारी वेंकट रोसैय्या यांचा पराभव करत ३.४ लाख मताधिक्याने विजय मिळवला.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने विश्लेषण केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, या निवडणुकीत पदार्पण करणारे पेम्मासानी व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत, त्यांची कौटुंबिक मालमत्ता ५,७०५ कोटी रुपये आहे.
ते तेनाली येथील बुरीपालेम गावचे रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब अनेक दशकांपासून टीडीपीचे समर्थक आहे. ते यूवर्ल्डचे संस्थापक देखील आहेत, जे परीक्षांसाठी डिझाइन केलेल्या ऑनलाइन शिक्षण साधनांसाठी एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
मोदी ३.० के मंत्रिमंडळात अशा खासदाराचे नाव समोर येत आहे, जो २०२४ लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत खासदार आहे. त्यांची संपत्ती ५७०० कोटीहून अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्याची शक्यता आहे. टीडीपी नेते जयदेव गल्ला यांनी सांगितले की, पेम्मासानी मोदी ३.० मध्ये राज्य मंत्री बनू शकतात. त्यांच्याशिवाय टीडीपीचे एक अन्य खासदार राम मोहन नायडू केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेऊ शकतात.
कोण आहेत टीडीपी खासदार चंद्र शेखर पेम्मासानी?
आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर येथील बुर्रिपलेम गावात जन्मलेले चंद्रशेखर पेम्मासानी यांनी उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी-सिनाई रुग्णालयात फिजिशियन म्हणून पाच वर्षे सेवा केली आहे.
४८ वर्षीय पेम्मासानी यूवर्ल्डचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्याचबरोबर ते टीडीपी एनआरआय सेलमध्ये सक्रीय होते. पेम्मासानी यांनी २०२० मध्ये अमेरिकेत एक युवा उद्योजक म्हणून अर्न्स्ट अँड यंग अवार्ड पटकावले होते. त्यांनी पेम्मासानी फाउंडेशनचीही स्थापना केली आहे. त्यांनी यावेळी गुंटूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळचे खासदार जयदेव गल्ला यांच्याजागी निवडणूक लढवली. निवडणूक प्रतिक्षापत्रनुसार पेम्मासानी यांच्याकडे २०२४ च्या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या ८,३६० उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती आहे.