टाटा ग्रुपची आयटी कंपनी TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. TCS ने स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले की, टाटा कन्सल्टेंसी सर्विसेज (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेश गोपीनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गोपीनाथन यांच्या जागी कृतिवासन यांना तत्काल प्रभावाने सीईओपदी नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान गोपीनाथन कंपनीतील बदल व आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या मदतीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत पदावर कार्यरत राहणार आहेत.
टीसीएस कंपनीने म्हटले आहे की, टाटा कंसल्टेंसी सर्विसेजमध्ये शानदार २२ वर्षाचे करिअर व मागील सहा वर्षापासून व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ पदावर कार्यरत राजेश गोपीनाथन यांनी आपल्या वैयक्तिक कारणासाठी पदावरून हटण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसने वर्तमान अध्यक्ष आणि बीएफएसआय व्यापार समूहाचे जागतिक प्रमुख कृतिवासन यांना तत्काल प्रभावाने सीईओसाठी नामांकित करण्यात आले आहे.
एका निवेदनानुसार संचालक मंडळाने कृतिवासन यांना सीईओ पदासाठी नामांकित केले आहे. त्यांची नियुक्ती १६ मार्च, २०२३ पासून लागू असेल. ते शीर्ष पदावर राजेश गोपीनाथन यांच्यासोबत काम करतील व त्यांना पुढच्या आर्थिक वर्षात व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पदी नियुक्त केले जाईल.
टीसीएसचा शेअर ३१८४.७५ रुपयांवर बंद झाला. हा शेअर एक दिवसापूर्वीच्या तुलनेत ०.४४% घसरणीनंतर बंद झाला. मार्केट कॅपबाबत बोलायचे तर चे ११,६५,३१६.३९ करोड़ रुपये आहे.