Viral News : पत्नीला पोटगी देण्यासाठी एक टॅक्सी चालक ८० हजार रुपयांची नाणी घेऊन कोयंबटूर कोर्टात पोहोचला. न्यायालयाने पोटगी म्हणून त्याला दोन लाख रुपये भरण्यास सांगितले होते. कोयंबटूर येथील अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयात बुधवारी ही घटना घडली. न्यायालयाने पत्नीला अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले होते.
कोर्टाच्या आदेशाचे पालन करत टॅक्सीमालक आणि ड्रायव्हरने रोख रकमेऐवजी २० बंडलमध्ये २ आणि १ रुपयांची नाणी आणली. या नाण्यांनी भरलेल्या दोन पांढऱ्या पिशव्या घेऊन तो कोर्टात पोहोचला. कोर्टात नाणी भरलेल्या पिशव्या पाहिल्यानंतर न्यायाधीशांनी त्या व्यक्तीला ही रक्कम नोटांच्या स्वरूपात देण्याचे निर्देश दिले. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्याने नाण्यांऐवजी ८० हजार रुपयांच्या नोटा दुसऱ्या दिवशी कोर्टात जमा केल्या. या सोबतच उर्वरित १.२ लाख रुपयांची पोटगीची रक्कम देखील लवकर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कोईम्बतूरमध्ये, एका टॅक्सी ड्रायव्हरने पत्नीला पोटगी देण्याचे आदेश दिले होते. हे पैसे भरण्यासाठी त्याने ८० हजार रुपयांच्या नाण्यांच्या पिशव्या घेऊन तो बुधवारी अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने त्या व्यक्तीला दोन लाख रुपये पोटगी भत्ता देण्याचे आदेश दिले होते. यामुळे टॅक्सी चालकाने २ आणि १ रुपयांच्या नाण्यांच्या २० पिशव्या घेऊन तो कोर्टात पोहोचला. हे पैसे पाहून न्यायाधीश चक्रावले. त्यांनी टॅक्सी चालकाला चिल्लर न देता नोटांच्या स्वरूपात पैसे देण्याचे आदेश दिले. तसेच उर्वरित रक्कम सुद्धा लवकर देण्याचे आदेश दिले.
कोईम्बतूर येथील ३७ वर्षीय टॅक्सीचालक वडवल्ली येथील रहिवासी असून त्याने त्याच्या पत्नी सोबत घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांच्या घटस्फोट मंजूर करून पती टॅक्सीचालकाला २ लाख रुपये अंतरिम देखभाल भत्ता देण्याचे आदेश दिले होते. यातील ८० हजार रुपयांची नाणी बुधवारी त्यांनी कोर्टात जमा करण्यासाठी घेऊन गेला. २ व १ रुपयांची नाणी असलेल्या २० पिशव्या पाहून कोर्टातील सर्व जण चक्रावले. मात्र, न्यायाधीशांनी त्याला ही रक्कम नोटांमध्ये देण्याचे आदेश दिले. नाण्यांचे बंडल घेऊन कोर्टातून बाहेर पडतानाचा या व्यक्तिचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्यांनी ८० हजार रुपयांच्या नोटा न्यायालयात जमा केल्या. उर्वरित १.२ लाख रुपये लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. या घटनेने लोकांना धक्का बसला आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संबंधित बातम्या