Viral News: प्रवासी महिलेला बॉयफ्रेन्डसोबत किती वेळा सेक्स केला? असा प्रश्न विचारणाऱ्या कॅब चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पीडित महिलेने कॅब चालक बोलत असतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही घटना दुबईत घडली.
naima.nsa या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओत कॅब चालक महिलेला तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत किती वेळा सेक्स केला आहे? असा प्रश्न विचारत आहे. त्यानंतर कॅब चालकाने तिला ती सध्या कोणत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंधात आहे, असे बोलतो. पुढे कॅब चालकाने सर्व मर्यादाच ओलांडल्या. त्याने महिलेला आज रात्री सेक्स केला नाही का? असे विचारले. हा संपूर्ण प्रकार महिलेने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की ‘तुम्ही बेकायदा टॅक्सीमधून प्रवास का करतात! पोलिसांनी बेकायदेशीर वाहनांवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही अनेक लोक बेकायदेशीर वाहनातून प्रवास करणे टाळतात. कृपया अशा गोष्टी टाळा आणि कायदेशीर वाहनांचा वापर करा. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, मला वाईट वाटते की तुम्ही माझ्या देशात अशा परिस्थितीतून गेलात. तुमची तक्रार असेल तर ती थेट पोलिसांशी संपर्क साधावा. एक इमिराती म्हणून, मी दुबईमध्ये बऱ्याचवेळा टॅक्सी आणि उबरचा वापर केला आहे आणि मला अशा समस्यांचा कधीही सामना करावा लागला नाही. कॅब चालकाला माहिती आहे की, मी तक्रार सादर करू शकतो आणि येथे प्रत्येकाला दुबईमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही सेवांबद्दल अभिप्राय देण्याचा अधिकार आहे. तुम्हाला हवे असेल तर या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात मदत करताना मला खूप आनंद होत आहे. मला गाडीचा तपशील, तारीख आणि घटनेचे ठिकाण द्या.’ तिसऱ्या व्यक्तीने या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले की, 'अहो ताई! तुम्हाला त्याच्या गाडीचा तपशील मिळाला का? थेट पोलिसांकडे. त्याला मोठा दंड ठोठावला जाईल आणि अटक केली जाईल.
संबंधित बातम्या