Viral Video: शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा बसला लटकून प्रवास; पुढं असं घडलं की...
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा बसला लटकून प्रवास; पुढं असं घडलं की...

Viral Video: शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा बसला लटकून प्रवास; पुढं असं घडलं की...

Jul 10, 2024 11:26 AM IST

Tamil Nadu Bus Viral Video: तामिळनाडू येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Viral Video Public Bus Viral Video: तामिळनाडूच्या चेंगलपट्टू येथील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. व्हायरल व्हिडिओत काही विद्यार्थी शाळेत पोहोचण्यासाठी चक्क बसला लटकून प्रवास करताना दिसत आहे. तितक्यात एका मुलाचा हात सटकतो आणि तो रस्त्यावर पडतो. सुदैवाने, बसच्या मागून कोणतेही वाहन नसल्याने या मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना बसच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वराने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक गट सार्वजनिक बसला लटकून चेयूरहून आचरपक्कमला जात आहे. मात्र, बस थोडी पुढे जाताच एका शाळकरी मुलाचा तोल जातो आणि तो रस्त्यावर पडतो. या घटनेत संबंधित मुलगा किरकोळ जखमी झाला. प्राथमिक उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वारने संपूर्ण घटना त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली. ही घटना मेलमारुवाथुरजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे.

नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विद्यार्थ्यांनी धोकादायक पद्धतीने प्रवास करणे टाळावे, असे एका युजरने म्हटले आहे. तर, या समस्येचे निराकरण करण्यासाठी पोलिस विभाग आणि सरकारला कठोर कारवाई करण्याचे दुसऱ्या युजरने आवाहन केले.

धोकादायक प्रवासाचे मुख्य कारण समोर

लोकल वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, परिसरातील रहिवाशांनी आरोप केला आहे की, चेयूर ते आचरपक्कमपर्यंत सार्वजनिक वाहतूक बसेसची कमतरता हे प्रवाशांच्या धोकादायक प्रवासाचे मुख्य कारण आहे. यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. या घटनेनंतर परिवहन विभागाने या मार्गावर बस सेवा वाढविण्याचे आवाहन केले आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर