१ हजार रुपये पेन्शनवर उदरनिर्वाह करणाऱ्या दोन दलित शेतकऱ्यांना ED ची नोटीस; पुढे काय झालं, वाचा..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  १ हजार रुपये पेन्शनवर उदरनिर्वाह करणाऱ्या दोन दलित शेतकऱ्यांना ED ची नोटीस; पुढे काय झालं, वाचा..

१ हजार रुपये पेन्शनवर उदरनिर्वाह करणाऱ्या दोन दलित शेतकऱ्यांना ED ची नोटीस; पुढे काय झालं, वाचा..

Jan 07, 2024 05:13 PM IST

ED Summoned Two Farmers : तामिळनाडूमधील दोन शेतकरी जे प्रतिमहिना मिळणाऱ्या १ हजार रुपये वृद्धावस्था पेन्शन व मोफत राशनवर उदरनिर्वाह करतात त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

ED Summoned Two Farmers
ED Summoned Two Farmers

सक्तवसुली संचलनालयाने (ED) तामिळनाडूतील दोन दलित शेतकऱ्यांना बजावलेल्या समन्सनंतर वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरण बंद करावे लागले. ५ जुलै २०२३ रोजी ७२ वर्षीय शेतकरी कन्नैयन आणि त्यांचा ६६ वर्षीय भाऊ कृष्णन यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र आता वाद वाढल्यानंतर प्रकरण बंद करण्यात आले आहे.  ईडीच्या या निर्णयाला राजकीय पक्षांबरोबरच जनतेमधूनही खूप विरोध झाला.

काय आहे प्रकरण?

एस कन्नैयन आणि त्यांचा भाऊ एस कृष्णन यांनी आपल्या शेतात अवैध पद्धतीने चारी बाजुनी तारेचे कुंपन घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. यामुळे दोन गवा रेड्यांचा बळी गेला होता. या प्रकरणात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ कलम २(१६), २(३६), आणि कलम ५१(१) सह कलम ९ नुसार २०१७ मध्ये एफआयआर दाखल केली होती. 

सत्र न्यायालयाने २८ डिसेंबर २०२१ रोजी कृष्णन आणि कन्नैयन दोघांना मुक्त केले होते. मात्र त्यानंतरही ईडीने एफआयआरची दखल घेत तसेच घटनेच्या संबंधात तामिळनाडू वन विभागाच्या पत्राचा आधार घेत

मार्च २०२२ मध्ये PMLA नियमांतर्गत तपास सुरू केला होता.  वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा  ५ जुलै २०२३ रोजी जारी केलेले सहा महिन्यापूर्वीचे समन्स सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले. तामिळनाडूतील राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी ईडी द्वारे बजावलेले समन्स व ईसीआयआर (Enforcement Case Information Report) मध्ये दोन्ही शेतकऱ्यांच्या जातीचा उल्लेख केल्याने आक्षेप नोंदवला. जी एका एफआयआर समान आहे. दरम्यान ईडीने जातीचा उल्लेख एक टायपो सांगितले होते. मात्र विरोध वाढत गेला.

कन्नैयन आणि कृष्णन तामिळनाडू राज्यातील सालेम जिल्ह्यातील रामनयागनपालयम गावातील रहिवासी आहेत. जामिनीसंबंधित वादामुळे त्यांनी गेल्या चार वर्षापासून शेती केली नाही. त्यांच्या बँक खात्यात केवळ ४५० रुपये आहेत. प्रतिमाह १००० रुपयांची वृद्धावस्था पेन्शन व मोफत राशनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

ईडीचे सहायक संचालक रितेश कुमार यांच्याकडून शेतकऱ्यांना जारी केलेल्या समन्सची तारीख २६ जून २०२३ आहे. त्यात म्हटले आहे की, दोन्ही शेतकऱ्यांनी ५ जुलै रोजी चौकशीसाठी एजन्सीच्या कार्यालयात हजर रहावे. 

दोन्ही भावांचा आरोप आहे की, भाजपा नेते गुणशेखर यांनी त्यांच्या जमिनीवर अवैध पद्धतीने कब्जा केला आहे. कृष्णन यांच्या तक्रारीनंतर २०२० मध्ये गुणशेखर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर त्यांना टक करण्यात आली व न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले.  कृष्णन आणि गुणशेखर यांच्या दरम्यान सुरू जमीन वादाची केस अत्तूर न्यायालयात सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या वकीलाने दावा केला की, ईडीची कार्रवाई त्यांच्या क्लायंटवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. ज्यांचा स्थानिक भाजप नेते जी. गुणशेखरसोबत एका कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत ईडी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, तामिळनाडू पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना अटक करावी. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार केली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर