Tamil Nadu Illicit Liquor Deaths: तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tamil Nadu Illicit Liquor Deaths: तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक!

Tamil Nadu Illicit Liquor Deaths: तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक!

Updated Jun 20, 2024 09:18 AM IST

Tamil Nadu Toxic Alcohol: तामिळनाडूच्या कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ६० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता.
तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता.

तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांनी दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

एमके स्टॅलिन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंचं वृत्त ऐकून मला धक्का बसला असून प्रचंड दु:ख झालं आहे. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, हा प्रकार होण्यासाठी जे कामचुकार अधिकारी कारणीभूत होते, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांची माहिती दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. "

कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक निलंबित

के. कन्नूकुट्टी (४९) याच्याकडून घातक मिथेनॉल असलेली सुमारे २०० लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. एम. के. स्टॅलिन यांनी गुन्हे शाखा-गुन्हे अन्वेषण विभागाला सखोल चौकशीचे आदेश दिले. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी श्रवणकुमार जाटवथ आणि निलंबित पोलीस अधीक्षक समय सिंह मीणा यांची बदली करण्यात आली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली रुग्णांची भेट

कल्लाकुरिची जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली. रजत चतुर्वेदी हे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक आहेत. एमके स्टॅलिन यांनी ज्येष्ठ मंत्री ईव्ही वेलू आणि एम. ए. सुब्रमण्यम यांना प्रभावित कुटुंबांच्या मदतीसाठी कल्लाकुरिची येथे पाठवले. पुद्दुचेरीच्या जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये सुमारे १५ जणांना दाखल करण्यात आले.

तामिळनाडूचे राज्यपाल शोकाकूळ

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून पीडितांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तामिळनाडू राजभवनाने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, "कल्लाकुरिचीमध्ये बनावट दारू प्यायल्याने अनेकांचे प्राण गेले हे ऐकून मला खूप धक्का बसला. तर अनेक जण गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. शोकसंतप्त कुटुंबियांप्रती आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी संवेदना व्यक्त करतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर