तालिबानने नवा फतवा जारी केला आहे. नव्या कायद्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये खिडक्या नसल्या पाहिजेत, तसेच खिडक्या असतील तर काढून टाकाव्या, असा अगळावेगळा फर्मान तालिबानने का काढला आहे. महिलांनी घराबाहेर पाहू नये, यासाठी तालिबानने हे आदेश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, महिलांना पहिल्यानंतर कोणीतरी अश्लील हावभाव आणि कृत्य करतील.
पाकिस्तानसोबतच्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर तालिबानी राजवटीने आपल्या देशातील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. देशात काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी अफगाण महिलांना अजिबात नोकरी देऊ नये, असा आदेश तालिबानने दिला आहे. यामागचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. तालिबानचा असा विश्वास आहे की नोकरी दरम्यान स्त्रिया हिजाब नीट घालत नाहीत. त्यामुळे त्यांना नोकऱ्या देणे बंद करा. याआधी तालिबानने म्हटले होते की, महिलांच्या खोल्यांमध्ये खिडक्या नसाव्यात, जर असतील तर त्या खिडक्या बंद कराव्यात.
तालिबानने सर्व स्वयंसेवी संस्थांना अफगाण महिलांना कामावर ठेवण्यास मनाई केल्यानंतर दोन वर्षांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आपल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे तालिबानने सोमवारी एका आदेशात म्हटले आहे. महिला इस्लामिक हिजाब नीट घालत नाहीत, असे त्यांचे म्हणणे असल्याने तालिबानने हे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे.
रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केलेल्या पत्रात अर्थ मंत्रालयाने इशारा दिला आहे की, ताज्या आदेशाचे पालन न केल्यास अशा स्वयंसेवी संस्थांना अफगाणिस्तानात काम करण्याचा परवाना गमवावा लागेल. देशी-विदेशी संघटनांच्या सर्व उपक्रमांची नोंदणी, समन्वय, नेतृत्व आणि देखरेख करण्याची जबाबदारी मंत्रालयाची आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
तालिबानच्या नियंत्रणाबाहेरील संस्थांमधील महिलांचे सर्व प्रकारचे काम बंद करण्याचे आदेश सरकारने पुन्हा एकदा दिले आहेत, असे पत्रात म्हटले आहे. असहकार केल्यास संस्थेचे सर्व उपक्रम रद्द केले जातील आणि मंत्रालयाने दिलेला संस्थेचा अॅक्टिव्हिटी लायसन्सही रद्द केला जाईल, असे पत्रात म्हटले आहे.
तालिबानने यापूर्वीच अनेक नोकऱ्यांमध्ये महिलांच्या सहभागावर आणि बहुतेक सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या उपस्थितीवर बंदी घातली आहे. तालिबानने महिलांना सहावीनंतरच्या शिक्षणापासूनही वंचित ठेवले आहे.
संबंधित बातम्या