Viral News : मुली त्यांच्या अश्रुचा वापर एखाद्या हत्याराप्रमाणे वापरतात अशी म्हण आहे. एखादा व्यक्ति रंगवला तर लगेच रडून समोरच्या व्यक्तीला राग मुली शांत करतात. मात्र, एका तरुणीने तिच्या अश्रुंचा वापर एका खऱ्या खुऱ्या शस्त्राप्रमाणे केला आहे. विश्वास बसत नाही ना. पण हे खरे आहे. या मुलीने तिच्या अश्रूंपासून घातक शस्त्र तयार केले असून याचा वापर ती तिला रडवणाऱ्यांवर करते. ही तरुणी तैवान मधील असून तिचे नाव यी फेई चेन असे आहे. यी ही नेदरलँड्समध्ये शिक्षण घेत असताना तिने अश्रुबंदूक तयार केली आहे. या शस्त्राच्या माध्यमातून ती आपल्या भावनांचा अनोख्या पद्धतीने वापर करत आहे.
यी ने तयार केलेली अश्रुबंदुक ही आधी तिच्या डोळ्यातून अश्रू गोळा करते. मग या अश्रु गोठवून बर्फाचे गोळे बंदुकीत तयार होतात. हे अश्रुगोळ्यांचा मारा ती तिला त्रास देणाऱ्यांवर करते. चेन यांनी सांगितले की, एका नेमणुकीवरून तिचा शिक्षकांशी वाद झाला होता. त्यानंतर तिला अश्रुबंदुकीची कल्पना सुचली. चेन ही तैवानमध्ये वाढली असून या ठिकाणी अधिकारी, विशेषत: शिक्षकांना आव्हान दिल्यास असभ्य मानलं जातं. चेन इच्छा असूनही कोणत्याही शिक्षकाविरोधात मत व्यक्त करू शकत नव्हती. मग आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करू शकतील असे काही तरी शस्त्र बनवण्याचा विचार तिच्या मनात आला.
नेदरलँड्समध्ये शिकत असताना, चेनने पदवी प्रकल्प म्हणून टियर गन तयार करण्याचा निर्णय घेतला. या बंदुकीचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यासाठी तिला तीन महिने लागले. आता ही बंदूक पूर्णपणे तयार झाली आहे. अश्रुबंदुक प्रथम अश्रू गोळा करते. यानंतर ती कार्बन डायऑक्साईडचा वापर करून अवघ्या २० सेकंदात तिचे साठवलेले अश्रु गोठवतो. यानंतर स्प्रिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून मिनी बर्फाच्या गोळ्यांप्रमाणे एकाद्या बंदुकीप्रमाणे ती अश्रुगोळे डागते.
चेनने सर्वप्रथम ज्या शिक्षकाशी त्याचा वाद झाला त्या शिक्षकाला या प्रकल्पाबद्दल सांगितले. विशेष म्हणजे शिक्षकांना तिची ही कल्पना आवडली. चेन म्हणाली, "ही बंदूक पाहून तिचे शिक्षक खुश झाले होते. पण तिने ही बंदूक तिच्या शिक्षकांवर हल्ला करण्यासाठीच तयार केली होती.
संबंधित बातम्या