Viral News : सिरियामध्ये ८ डिसेंबरला सत्तापातट झाले. असद कुटुंबाच्या दहशतीतून सिरिया मुक्त झाला. येथील नागरिक हे स्वातंत्र्य साजरे करत असतांना आता नवे संकट देशापुढे उभे ठाकले आहे. तब्बल दोन दशकं यादवी युद्धात अडकलेल्या या देशातील जनतेपुढे आता महागाईचा भस्मासुर उभा राहिला आहे. सोशल मीडियावर एका इन्फ्लुएंसरने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, सीरियामध्ये काहीही खरेदी करण्यासाठी रोख रकमेवर अवलंबून राहावे लागते. व्हायरल व्हिडिओनुसार, इथल्या लोकांनी पर्स ठेवणं बंद केलं आहे. महागाई वाढल्याने इथे काही पैशांएवजी नोटांची बंडलं सोबत ठेवावी लागत आहे.
ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अलोना कॅराफिनाने हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. यात ती नोटांची अनेक बंडलं देऊन आतापर्यंत 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यादवी युद्धानंतर सीरियाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र या व्हिडिओतून समोर आले आहे. इथल्या रेस्टॉरंटमधील मेन्यूमध्ये कुठल्याही गोष्टीची किंमत लिहिलेली नसते कारण इथे कुठलीही किंमत ठरलेली नाही, असं अलोना या व्हिडिओत स्पष्ट करते. इथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठीही नोटांचे बंडल द्यावे लागतात. परकीय निर्बंधांमुळे सीरियाची अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त झाली, हे या व्हिडिओत अॅलिओना सांगते. परदेशी ब्रँडही आपली उत्पादने तेथे विकत नाहीत, त्यामुळे तेथील स्थानिक उत्पादनांच्या बळावर जनता आपले जीवन जगत आहे.
सीरियात असद सरकार उलथून टाकल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. यादवी युद्धामुळे या देशातील परिस्थिती आधीच वाईट आहे. पहिले ५० सिरियन पौंड एका डॉलरच्या बरोबरीचे होते, परंतु काही दिवसांतच १ डॉलरसाठी १५,००० सिरियन पौंड मोजावे लागत आहे. अलोनाच्या या व्हिडिओवर लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी याला दिशाभूल करणारे म्हटले, तर अनेकांनी याला यादवी युद्धाचा परिणाम महटले आहे. तर काही जणांनी सिरियन लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
एका युजरने लिहिले की, एखाद्या देशाला अशा परिस्थितीला सामोरे जातांना पाहून वाईट वाटते. आणखी एका युजरने लिहिले की, एकेकाळी सीरिया आपल्या संस्कृती आणि इतिहासासाठी ओळखला जात होता आणि आज परिस्थिती इतकी बिकट झाली आहे. आणखी एका व्यक्तीने लिहिले की, मी अशा परिस्थितीत जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.
संबंधित बातम्या