Syria Civil War News: मध्य पर्वमधील देश सीरियावर बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या राजवटीचे पतन झाले असून असद देश सोडून पळून गेले आहेत. बंडखोरांनी पब्लिक रेडियो आणि टीव्ही बिल्डिंगवर नियंत्रण मिळवले आहे. येथूनच ते नव्या सरकारची घोषणा करू शकतात. बंडखोर संपूर्ण शहरात जल्लोष करत असून हवेत गोळीबार करताना दिसत आहेत.
सीरियात बंडखोरांनी दमास्कस ताब्यात घेतल्याची घोषणा केली असून यासह राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची राजवट संपुष्टात आली आहे. दमास्कसच्या रस्त्यांवर बरेच लोक जल्लोष करताना दिसत असून असद पळून गेल्याने आता दमास्कस मुक्त झाल्याचे बंडखोरांनी सांगितले. कारागृहातील सर्व कैद्यांची सुटका करण्यात यावी, असे बंडखोरांनी दूरचित्रवाणीवरून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दमास्कसचे रस्ते अल्लाह-हु-अकबरच्या जयघोषाने आणि गोळीबाराच्या आवाजाने गजबजले होते. बंडखोर हवेत गोळीबार करून जल्लोष करताना दिसले.
काही बंडखोरांनी असद यांच्या वडिलांच्या पुतळ्यावर चढून तोडफोड केली. "आम्ही बऱ्याच दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. सीरियात आज एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. इस्लामी हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) या बंडखोर गटाला तुर्कस्तानचा पाठिंबा आहे. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा अलेप्पो ताब्यात घेतला होता. यानंतर एक-एक करून शहरे जिंकून दमास्कसला पोहोचले. ५० वर्षांच्या अत्याचारानंतर बाथची राजवट संपुष्टात आली आहे, असे बंडखोर गटाने टेलिग्रामवर म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत अनेकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. आम्ही जाहीर करतो की काळे दिवस संपले आहेत आणि सीरियासाठी एक नवीन युग सुरू होत आहे.
सीरियाचे पंतप्रधान मोहम्मद अल जलाली यांनी सरकार निवडण्यासाठी सिरियन जनतेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स रामी अब्देल रहमान यांनी सांगितले की, ते दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गे सीरिया सोडून गेले आहेत. एएफपीने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. एचटीएसने म्हटले आहे की, त्यांचे सैनिक तुरुंगातून कैद्यांची सुटका करत आहेत. तत्पूर्वी बंडखोरांनी होम्सवर ताबा मिळवला होता. होम्स ते दमास्कस हे अंतर अवघे १४० किलोमीटर होते.
असद देश सोडून अज्ञात स्थळी गेले आहेत, असा दावा सिरियन विरोधी पक्ष वॉर मॉनिटरच्या प्रमुखांनी केला आहे. सीरियाचे पंतप्रधान मोहम्मद गाझी जलाली यांनी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून शांततेने विरोधकांकडे शासनाची सूत्रे सोपविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या निवासस्थानी आहे आणि कुठेही गेलो नाही आणि याचे कारण माझे माझ्या देशावर प्रेम आहे, असे जलाली यांनी सांगितले. सकाळी कामावर जाण्यासाठी कार्यालयात जाणार असल्याचे त्याने सांगितले. त्यांनी सिरियन नागरिकांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन केले.
२०१८ नंतर पहिल्यांदाच बंडखोर दमास्कसच्या आत दाखल झाले आहेत. अनेक वर्षांच्या वेढय़ानंतर २०१८ मध्ये सिरियन सैन्याने पुन्हा राजधानीच्या बाहेरील भागावर ताबा मिळवला. दमास्कस विमानतळ रिकामे करण्यात आले असून सर्व उड्डाणे थांबविण्यात आल्याचे सरकारसमर्थक शाम एफएम रेडिओने म्हटले आहे. बंडखोरांनी राजधानीच्या उत्तरेकडील सैदनाया लष्करी कारागृहात घुसून कैद्यांची सुटका केल्याचेही जाहीर केले.
आदल्या रात्री सरकारी सैन्य सीरियातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होम्स येथून मागे हटले होते, त्यानंतर विरोधी सैन्याने ते ताब्यात घेतले होते. हे शहर राजधानी दमास्कस आणि सीरियाच्या किनारपट्टीवरील लताकिया आणि तार्तुस प्रांतांच्या दरम्यान वसलेले आहे. हे प्रांत सिरियन नेत्याचा बालेकिल्ला असून येथे रशियन नौदलाचा तळही आहे. दरम्यान, असद देश सोडून गेल्याच्या अफवांचे सरकारने खंडन केले आहे. सीरियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराबाहेर सरकारी सैन्याने पोझिशन घेतली आहे, अशी माहिती सरकारसमर्थक शाम एफएम यांनी अधिक माहिती न देता दिली.
अब्दुर रहमान म्हणाले की, सिरियन सैनिक आणि विविध सुरक्षा यंत्रणांचे जवान शहरातून माघार घेत आहेत आणि बंडखोर शहराच्या काही भागात घुसले आहेत. सीरियातील जिहादी हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) या बंडखोर गटाचे प्रमुख अबू मोहम्मद अल-गोलानी यांनी गुरुवारी सीरियातून सीएनएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, असद यांचे सरकार उलथवून टाकण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सीरियाविषयक विशेष दूत गीर पेडरसन यांनी सिरियात सुव्यवस्थित राजकीय स्थित्यंतरे घडवून आणण्यासाठी जिनिव्हायेथे तातडीने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, अमेरिकेने सीरियात लष्करी कारवाई टाळावी. ही आमची लढाई नाही, असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट मध्ये म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी कॅलिफोर्नियातील सभेत सांगितले की, सीरियातील यादवी युद्धात अमेरिका लष्करी हस्तक्षेप करणार नाही. "
संबंधित बातम्या