मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च केल्याने चौघांना ४.५ वर्षांचा तुरुंगवास

हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च केल्याने चौघांना ४.५ वर्षांचा तुरुंगवास

Jun 22, 2024 09:48 AM IST

Hinduja Family News: ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाविरोधात स्विस न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा व त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांना घरातील नोकरांना वाईट वागुणूक व गैरवर्तन केल्याप्रकरणी साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! घरगुती नोकरासोबत गैरवर्तन केल्याने ४ जणांना ४.५ वर्षांचा तुरुंगवास
हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! घरगुती नोकरासोबत गैरवर्तन केल्याने ४ जणांना ४.५ वर्षांचा तुरुंगवास

Hinduja Family : ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाविरोधात स्विस न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा व त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांना घरातील नोकरांना वाईट वागुणूक व त्यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. जिनिव्हा येथील त्याच्या व्हिलामध्ये नोकरांचे शोषण होत होते. नोकरापेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. फौजदारी न्यायालयाने हिंदुजा कुटुंबातील सदस्यांना नोकरांच्या मानवी तस्करीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. यातील बहुतेक नोकर अशिक्षित भारतीय होते जे जिनिव्हा येथील त्याच्या आलिशान लेकसाइड व्हिलामध्ये काम करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील चार सदस्यांपैकी कोणीही जिनिव्हा न्यायालयात हजर नव्हते. मात्र, या प्रकरणातील पाचवा आरोपी नजीब झियाजी न्यायालयीन कामकाजात उपस्थित राहिला. जियाजी हे हिंदुजा कुटुंबाचे बिझनेस मॅनेजर आहेत. त्याला १८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मंत्री यानंतर त्याला १ वर्षांची निलंबणाची शिक्षा ठोठावण्यात आली. ही एक कायदेशीर व्यवस्था आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा दिली जात नाही, परंतु भविष्यात त्या गुन्ह्यासाठी शिक्षा होऊ शकते.

स्विस कोर्टाने भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांना कामगारांचे शोषण आणि अनधिकृत पद्धतीने रोजगार दिल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. मात्र, मानवी तस्करीचे आरोप फेटाळण्यात आले. न्यायालयाने सांगितले की, कर्मचाऱ्यांनी कोणत्या अटींवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे, हे त्यांना समजले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी कमल हिंदुता यांना ४ वर्षे ६ महिन्यांची, तर त्यांचा मुलगा अजय आणि पत्नी नम्रता यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या भारतीय घरगुती नोकरांना ओलीस ठेवल्याचा व त्यांना कमी पगार देऊन त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये हिंदुजा कुटुंबाने त्यांच्या नोकरांना दिलेला पगार कुटुंबाच्या पाळीव कुत्र्याच्या खर्चापेक्षा कमी असल्याचे म्हटले होते. त्यांचे पासपोर्ट देखील हिंदुजा कुटुंबीयांनी जप्त केल्याचा आरोप होता.

हिंदुजा कुटुंब अनेक दशकांपासून स्वित्झर्लंडमध्ये राहत आहे. हिंदुजा कुटुंबीयांनी नोकरांना जास्त तास काम करायला लावले व त्या बदल्यात रोज फक्त ८ डॉलर (सुमारे ६५० रुपये) वेतन दिले. प्रकाश हिंदुजा यांना यापूर्वी २००७ मध्ये अशाच प्रकारच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात स्विस अधिकाऱ्यांनी हिंदुजा कुटुंबीयांवर कारवाई करत हिरे, माणिक व प्लॅटिनम नेकलेससह अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत, ज्याचा वापर कायदेशीर शुल्क व संभाव्य दंड भरण्यासाठी केला जाऊ शकतो. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, स्वयंपाकी आणि घरगुती नोकरांना काहीवेळा दिवसातून १८ तास काम करण्यास भाग पाडले जात असे. तसेच त्यांना सुट्ट्या देखील दिल्या जात नव्हत्या. स्विस कायद्यानुसार आवश्यक असलेल्या रकमेच्या एक दशांशपेक्षा कमी रक्कम नोकरांना देण्यात आली.

काही कर्मचारी फक्त हिंदी बोलत होते. हे पैसे त्यांना भारतातील एका बँक खात्यात देण्यात आले होते जे ते वापरू शकत नव्हते. प्रकाश हिंदुजा यांच्याविरुद्ध करचुकेवे गिरी प्रकरणी देखील एक प्रकरण प्रलंबित आहे. प्रकाश हिंदुजा यांना २००० मध्ये स्विस नागरिकत्व मिळाले. प्रकाश व त्यांचे तीन भाऊ असलेले हिंदुजा कुटुंब विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या औद्योगिक समूहाचे नेतृत्व करतात. फोर्ब्स मासिकाने त्यांची एकूण संपत्ती सुमारे २० अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

माणसांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च

स्विस सरकारी वकील यवेस बर्टोसा यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुजा कुटुंबाने त्यांच्या एका नोकराला दिलेल्या पगारापेक्षा जास्त पैसे त्यांच्या पाळीव कुत्र्यावर खर्च केले. भारतीय कामगारांच्या कथित तस्करी आणि शोषणाशी संबंधित खटल्यादरम्यान बर्टोसा यांनी ही माहिती कोर्टात सादर केली. सोमवारी, सरकारी वकिलांनी हिंदुजा कुटुंबाच्या कृतीवर तीव्र टीका केली आणि या प्रकरणी कुटुंबीयांना साडेपाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्याची शिफारस केली. बर्टोसाचा युक्तिवाद कर्मचारी आणि हिंदुजा कुटुंबाने दिलेल्या साक्ष आणि खटल्याच्या तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे यावर आधारित होते.

WhatsApp channel
विभाग