मधमाशांचा एकमेकींना ‘बिनशर्त’ पाठिंबा; हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली मने, पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मधमाशांचा एकमेकींना ‘बिनशर्त’ पाठिंबा; हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली मने, पाहा VIDEO

मधमाशांचा एकमेकींना ‘बिनशर्त’ पाठिंबा; हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली मने, पाहा VIDEO

Updated Jul 08, 2024 08:21 PM IST

Bees Video : मादी मधमाशांचा एक गट कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मधमाशीच्या मदतीला धावून आला आणि तिला बाहेर काढलं. मधमाशांनी तिला केवळ १० मिनिटात जाळ्यातून मुक्त केलं.

मधमाशांचा एकमेकींना बिनशर्त पाठिंबा
मधमाशांचा एकमेकींना बिनशर्त पाठिंबा (Instagram/@holistic_wildflower)

'मधमाशा वाचवा' ही चळवळ एक जागतिक रुप घेत आहे. ज्याचा उद्देश मधमाश्यांच्या जातींचे रक्षण करणे आहे, कारण ते पिकांचे परागण तयार करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. इन्स्टाग्राम युजर फराह किंग हा सोशल मीडियावरील सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक आहे. नुकताच किंगने मधमाशी वाचवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेली एक मधमाशी मोकळी होण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने या माशीला वाचवून दुसऱ्या वसाहतीत ठेवल्यानंतर तिला आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली.

या क्षणाचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  ती मधमाशी कोळ्याने केलेल्या जाळ्यात अडकली होती, त्यामुळे तिचे पंख तुटले होते व ती एकदम अपंग झाली होती.  तिला जाळ्यातून काढून तिला जवळच असणाऱ्या मधमाशांच्या पोळ्याजवळ ठेवले. त्यानंतर लगेचच मादी मधमाशांचा एक गट तिच्या मदतीला धावून आला आणि तिला बाहेर काढलं. मधमाशांनी तिला केवळ १० मिनिटात जाळ्यातून मुक्त केलं.

फराह हिने दुसऱ्यांदा जाळ्यात गुंडाळलेल्या मधमाश्यांना अज्ञात पोळ्याकडे नेले.  दोन्ही वेळा मधमाश्यांनी दुसऱ्या मधमाशीला बिनशर्त आधार आणि मदत दाखवली आहे. मधमाश्या स्वतःच्या वसाहतीतील मधमाशी असो वा नसो, एकमेकांची कशी काळजी घेतात आणि कशी मदत करतात हे आश्चर्यकारक आहे. सर्वांच्या हितासाठी त्यांनी केलेले ऐक्य आणि सहकार्याचे कार्य मला सतत प्रेरणा देत आहे. ते मानवतेलाही प्रेरणा देतील,' असे किंग म्हणाल्या.

हा व्हिडिओ (@goodnews_movement) ने इन्स्टावर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मादी मधमाश्या कोळ्याच्या जाळ्याखाली अडकलेल्या मधमाशीला वाचवतात! या पोस्टला नव्वद हजारांहून अधिक लाईक्स आणि नऊशेहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

पाहा मधमाश्यांचा व्हायरल व्हिडिओ:

या व्हिडिओवर अनेक युजर्संनी कमेंट्स केले आहेत. एकाने म्हटले आहे की, 'महिलांना पाठिंबा देणाऱ्या महिला!' ही कमेंट मूळ पोस्टरलाही लाईक झाली असून, दीड हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अन्य एकाने कमेंट केली आहे की, जग कोण चालवतं?!' मधमाश्या!" आणखी एका युजरने लिहिलं, 'चला मधमाश्यांसारखं होऊ या.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर