मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल-swati maliwal allegation of assault arvind kejriwal residence delhi police pcr call ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

May 13, 2024 03:58 PM IST

Swati Maliwal Assault Case : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार तसेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्विय सहायकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

स्वाती मालिवाल यांना  केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण
स्वाती मालिवाल यांना केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण

आम आदमी पार्टी (आप) च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल सोमवारी सिविल लाइन्स पोलीस ठाण्यात दाखल झाल्या व गंभीर आरोप लावले. स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी गैरवर्तन केले गेले. त्यांनी केजरीवालाच्या स्वीय सहाय्यकावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.एका पोलीस पुलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार तसेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्विय सहायकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

अरविंद केजरीवाल यांचे पी. ए विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आल्याचा दावा स्वाती मालीवाल यांनी केला आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांना फोन केलेल्या व्यक्तीने स्वाती मलिवाल असल्याचा दावा केला. या फोननंतर दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मालीवाल यांनी पीसीआर कॉलही केला होता व वाद घातल्याचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दोन कॉल आले होते. सिविल लाइन्स पोलीस ठाण्याचे एक पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान दिल्ली पोलीस, स्वाती मालिवाल, आम आदमी पार्टी तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून कोणतेही निवेदन आलेले नाही.

मात्र भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात टीकाटिप्पणी सुरू केली आहे.भाजप नेते अमिल मालवीय यांनी एक्स वर लिहिले की, आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पीए ने त्यांच्यावर हल्ला केला. दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानातून फोन केला गेला. केजरीवाल यांच्या अटकेनंतर स्वाती मालिवाल यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी ती भारतात नव्हती व खूप दिवसांनी देशात परतली होती.

 

स्वाती मालिवाल आम आदमी पार्टीच्या तडफदार नेत्या आहेत. याचवर्षी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. याआधी त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या व महिलांवर होण्याच्या अत्याचाराविरोधात सक्रीय राहून काम केले होते. स्वाती आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. जंतर मंतरवरील अन्ना हजारेंच्या आंदोलनावेळी त्या अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होती.