मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद यांची आज जयंती; त्यांचे विचार वाचून कळेल जीवनाचा खरा अर्थ!

Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद यांची आज जयंती; त्यांचे विचार वाचून कळेल जीवनाचा खरा अर्थ!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 12, 2024 08:25 AM IST

Swami Vivekananda Birth Anniversary: स्वामी विवेकानंद यांची आज १६१ वी जयंती आहे.

swami vivekananda jayanti 2024
swami vivekananda jayanti 2024

Swami Vivekananda Inspiring Quotes: संपूर्ण देशभरात आज स्वामी विवेकानंद यांची १६१ वी जयंती साजरी केली जात आहे. स्वामी विवेकानंद हे एक समाजसेवक, समाजसुधारक होते, ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली. एकविसाव्या शतकातही स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा तरुणांवर आणि सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या विचारांमुळे अनेकांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व बदलले आहे. आजही कोट्यवधी तरुण विवेकानंदांना आपला आदर्श मानतात.

स्वामी विवेकानंद यांनी १८९३ शिकागो, अमेरिकेतील जागतिक धर्म महासभेत भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले आणि अध्यात्माने परिपूर्ण भारतीय वेदांत तत्त्वज्ञान अमेरिका आणि युरोपच्या क्षितिजापर्यंत पोहोचवले. रामकृष्ण परमहंसांचे एक प्रतिष्ठित शिष्य स्वामी विवेकानंद यांनी शिकागोतील भाषणाची सुरुवात 'माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो' या शब्दाने केली. त्यांच्या भाषणातील पहिल्या वाक्याने जगाची मने जिंकली.

स्मामी विवेकानंद यांचे विचार

- उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.

-चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

- इतरांसाठी जगणे म्हणजेच खरे जीवन.

- जसा विचार कराल, तसेच घडाल.

- कमकुवत विचार तुम्हाला कमकुवत करतील आणि बलवान विचार तुम्हाला बलवान करतील.

- एक विचार तुमच्या जीवनाशी जोडा, त्याबाबत स्वप्न पाहा, त्याला जगा. शरीराचा प्रत्येक अवयव त्या विचारात बुडून जाऊ द्या आणि बाकीचे सर्व विचार बाजूला ठेवा. यशस्वी होण्याचा हा मार्ग आहे.

- सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वतःच्या स्वभावाशी सत्य असणे. स्वतःवर विश्वास ठेवा.

- एका वेळी एकच गोष्ट करा, ते करताना तुमचे सगळे लक्ष्य त्यावरच केंद्रीत करा, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

- आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.

- स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

दरम्यान, ४ जुलै १९०२ साली दिवशी स्वामी विवेकानंद यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला.

WhatsApp channel

विभाग