मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माय-लेकामध्ये अवैध संबंधाचा संशय, पतीने बंद खोलीत खेळला रक्तरंजित खेळ

माय-लेकामध्ये अवैध संबंधाचा संशय, पतीने बंद खोलीत खेळला रक्तरंजित खेळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 29, 2023 10:52 PM IST

पत्नी व मुलामध्ये अवैध संबंध असल्याचा संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

माय-लेकामध्ये अवैध संबंधाचा संशयातून हत्याकांड
माय-लेकामध्ये अवैध संबंधाचा संशयातून हत्याकांड

पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यात एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येचा आरोप महिलेच्या पतीवर करण्यात येत आहे. घटनेपासून तो फरार आहे. सांगितले जात आहे की, त्याला पत्नी व मुलामध्ये अवैध संबंध असल्याचा संशय होता. याप्रकरणी आरोपीच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नात्याला काळीमा फासणारी ही घटना वर्धमान जिल्ह्यातील कालना परिसरातील आहे. येथे मदन बाग आपली पत्नी ठाकुरानी बाग (वय ४२), दोन मुली व मुलासोबत रहात आहे. महिलेच्या भावाने सांगितले की, मदन खूप काळापासून आपली पत्नी आणि १६ वर्षाच्या मुलामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. या कारणामुळे मुलाला त्याने आजोळी पाठवले होते. तो मालदा मधील एका हॉटेलमध्ये काम करतो व जमाई षष्ठीच्या निमित्त घरी आला होता.

त्यांनी पुढे सांगितले की, बहिणीला आपल्या मुलाला पाहण्याची इच्छा झाली असेल. यावरून तिची व तिच्या पतीमध्ये वाद झाला असेल. त्यानंतर त्याने धारदारशस्त्राने तिची हत्या करून फरार झाला. सकाळी आई खोलीतून बाहेर न आल्याने छोट्या मुलीने खोलीत डोकावले असता आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

 

त्यानंतर नातेवाईक व परिसरातील लोकांना सूचना देण्यात आली.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी महिलेच्या छोट्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

IPL_Entry_Point

विभाग