मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या संशयितास उज्जैनमध्ये अटक

Rahul Gandhi : राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या संशयितास उज्जैनमध्ये अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 24, 2022 08:37 PM IST

राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या संशयितास नागदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.

राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या संशयितास उज्जैनमध्ये अटक
राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या संशयितास उज्जैनमध्ये अटक

मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास पकडण्यात उज्जैन जिल्ह्यातील नागदा पोलिसांना यश आले आहे. मात्र,पोलीस अजूनही त्याला संशयित मानत आहेत. हा आरोपी रायबरेलीचा रहिवासी आहे. गुन्हे शाखेने पाठवलेल्या फोटोवरून नागदा पोलिसांनी त्याला पकडले असून पुढील कारवाईसाठी इंदूर गुन्हे शाखेला कळविण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आल्यावर त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी संशयित आरोपीने दिली होती.

इंदूर क्राईम ब्रँचने उज्जैन जिल्ह्यातील नागदा पोलिसांना एक फोटो पाठवून राहुल गांधींना धमकी देणाऱ्या आरोपीचा हा चेहरा आहे. या फोटोच्या आधारे नागदा पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. गुरूवारी दुपारीदोन वाजण्याच्या सुमारास नागदा येथील बायपासवरील एका हॉटेलमध्ये अशा वर्णनाचा एक व्यक्ती जेवण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला पकडून पोलीस ठाण्यात आणले. दया सिंग असे संशयित आरोपीने नाव आहे. हा शीख आहे. या व्यक्तीकडे आढळलेल्या आधार कार्डावरील पत्ता रायबरेली,उत्तर प्रदेशचा आहे. वॉर्ड क्रमांक २४ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंदूर क्राईम ब्रँचमध्ये नमूद केल्याप्रमाणेया व्यक्तीचे नाव आहे. नागदा पोलिसांनी इंदूर क्राईम ब्रँचला याबाबत माहिती दिली आहे. आता इंदूर गुन्हे शाखा नागदा येथे येऊन आरोपीची ओळख पटवणार आहेत. उज्जैनचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितले की, इंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एकपत्र सापडले आहे, ज्यामध्ये राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या आधारे इंदूर पोलीस तपास करत आहेत. नागडा पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे, तो मूळचा रायबरेली,उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला पकडण्यासाठी इंदूर पोलीस पोहोचत आहेत. पुढील तपासातच या प्रकरणाचा निर्णय होईल.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या