मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  GN Saibaba Acquitted : प्रा. साईबाबांचा तुरुंगवास कायम.. हायकोर्टाच्या निर्णयाला SC ची स्थगिती

GN Saibaba Acquitted : प्रा. साईबाबांचा तुरुंगवास कायम.. हायकोर्टाच्या निर्णयाला SC ची स्थगिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 15, 2022 02:30 PM IST

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणात साईबाबा यांचा तुरुंगवास कायम राहणार असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राज्य सरकाला दिलासा मिळाला आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाला SC ची स्थगिती
हायकोर्टाच्या निर्णयाला SC ची स्थगिती

नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा (GN Saibaba) यांची मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली होती. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून प्राध्यापक जीएन साईबाबा यांची हायकोर्टाने सुटका केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणात साईबाबा यांचा तुरुंगवास कायम राहणार असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राज्य सरकाला दिलासा मिळाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एमआर शहा आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने दाखल याचिकेवर सर्वोच्य न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आपल्या आदेशात खंडपीठानं म्हटलं की, आमचं ठाम मत आहे की, उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची गरज आहे. कलम ३९० सीआरपीसी आणि १९७६ (३) एससीसी १ मधील या न्यायालयाच्या या निकालावर विचार करण्याची गरज आहे. 

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने जीएन साईबाबांना पुन्हा तुरुंगातच राहावं लागणार आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ८ डिसेंबरनंतर होणार आहे. त्यामुळे साईबाबा यांचा तुरुंगवास २ महिन्यांनी वाढला आहे. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता करून त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. 

IPL_Entry_Point