Supreme Court News Viral News : माझ्या मेंदूवर कुणीतरी कसल्यातरी यंत्राने नियंत्रण मिळवलं असल्याचा दावा करणारी अजीब याचिका एका व्यक्तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका न्यायाधीशांपर्यंत पोहोचताच त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. ही याचिका पाहून न्यायाधीश चक्रावले असून या याचिकेत आम्हाला कसा हस्तक्षेप करता येईल असा सवाल करत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, कोर्टाने म्हटलं की, "याचिकाकर्त्याच्या वतीने एक विचित्र बाब न्यायालयात मांडली. त्यांन याचिकेत म्हटलं की काही यंत्राच्या साह्याने काही लोक त्याच्या मेंदूवर नियंत्रण ठेवत आहेत. न्यायाधीश म्हणाले आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोणताही वाव किंवा कारण दिसत नाही.
याचिकाकर्त्याने यापूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती. काही लोकांनी सीएफएसएल म्हणजेच सेंट्रल फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरीकडून ह्युमन ब्रेन रीडिंग मशिनरी मिळवली असून त्याच्यावर या यंत्राचा वापर करून त्याच्यावर कुणीतरी नियंत्रण ठेवत असलीच त्यांन म्हटलं होतं. हे मशिन निष्क्रिय करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली होती.
त्यानंतर सीएफएसएल, सीबीआयने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं की, याचिकाकर्त्याची अशी कोणतीही फॉरेन्सिक तपासणी करण्यात आलेली नाही. अशा वेळी मशिन निष्क्रिय करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर पेशाने शिक्षक असलेल्या याचिकाकर्त्याने या आदेशाला आव्हान देणारी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीला याचिकाकर्त्याशी त्याच्या मातृभाषेत संभाषणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून त्याची समस्या समजून घेता येऊ शकेल. याचिकाकर्त्याशी बोलल्यानंतर एससीएलएससीने मन नियंत्रण यंत्र निष्क्रिय करायचे असल्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता.