SCI Recruitment: सर्वोच्च न्यायालयात नोकरी, 'या' पदांसाठी मागवले अर्ज, आजपासून नोंदणीला सुरुवात!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SCI Recruitment: सर्वोच्च न्यायालयात नोकरी, 'या' पदांसाठी मागवले अर्ज, आजपासून नोंदणीला सुरुवात!

SCI Recruitment: सर्वोच्च न्यायालयात नोकरी, 'या' पदांसाठी मागवले अर्ज, आजपासून नोंदणीला सुरुवात!

Jan 14, 2025 03:59 PM IST

SCI Recruitment 2025: सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी
सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी

Supreme Court of India Recruitment 2025: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये लॉ क्लार्क-रिसर्च असोसिएट्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार १४ जानेवारी २०२५ पासून सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट sci.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेच्या माध्यमातून संस्थेत ९० रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०२५ आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू: १४ जानेवारी २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ फेब्रुवारी २०२५

लेखी परीक्षा: ९ मार्च २०२५

पात्रता निकष: या पदांवर अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यताप्राप्त कोणत्याही लॉ स्कूल / कॉलेज / कॉलेजमधील पदवी असणे आवश्यक आहे. विद्यापीठातून कायद्याची पदवी असणे बंधनकारक आहे. याशिवाय ५ किंवा ३ वर्षांच्या लॉ कोर्सच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र त्यांना कायद्याची पात्रता मिळवल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

वयोमर्यादा: उमेदवाराची वयोमर्यादा ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी २० वर्षे ते ३२ वर्षे असावी.

अर्ज शुल्क: लॉ क्लर्क-रिसर्च असोसिएट पदासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागणार आहे. अन्य कोणत्याही स्वरूपातील अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही. टपाल अर्जही स्वीकारले जाणार नाहीत. युको बँकेने उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवेद्वारे शुल्क ाचा भरणा ऑनलाइन केला जाणार आहे.

निवड प्रक्रिया: सर्वोच्च न्यायालयात लॉ क्लर्क-रिसर्च असोसिएट्स पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची ३ टप्प्यांत चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात बहुपर्यायी प्रश्न असतील. यामुळे उमेदवारांची कायदा समजून घेण्याची आणि लागू करण्याची क्षमता आणि आकलन कौशल्य तपासले जाईल. दुसऱ्या टप्प्यात सब्जेक्टिव्ह लेखी परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत.

वेतन: लॉ क्लर्क - रिसर्च असोसिएट्सची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात अल्पमुदतीच्या कंत्राटी नेमणुकीवर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना २०२५ ते २०२६ या कालावधीसाठी ८० हजार रुपये वेतन दिले जाईल.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. भरती संदर्भात सगळी माहिती जाणून घेतल्यानंतरच अर्ज करावा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर