SC on Breakup : हार्टब्रेक बनला आयुष्याचा भाग! प्रेमभंग व आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय-supreme court news breakup girlfriend and boyfriend love relationship tips law updates ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SC on Breakup : हार्टब्रेक बनला आयुष्याचा भाग! प्रेमभंग व आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SC on Breakup : हार्टब्रेक बनला आयुष्याचा भाग! प्रेमभंग व आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 13, 2024 08:28 AM IST

supreme court on breakup and suicied case : ब्रेकअपनंतर मुलाने प्रेयसीला तिच्या किंवा त्याच्या पालकांच्या इच्छेनुसार लग्न करण्यास सांगणे हा गुन्हा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे.

supreme court on breakup and suicide case
supreme court on breakup and suicide case

supreme court on breakup and suicide case : सध्या व्हेलेंटाईन वीक सुरू आहे. या प्रेमोत्सवात सर्वोच्च न्यायालयाने मोठे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, प्रेमप्रकरण, नातेसंबंध आणि हृदयविकार आज दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. अशा परिस्थितीत, ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीला तिच्या पालकांच्या सल्ल्यानुसार किंवा इच्छेनुसार लग्न करण्याचा सल्ला देऊन तिला (मुलीला) आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे म्हणजे गुन्हा म्हणता येणार नाही. प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून एका तरुणाची निर्दोष मुक्तता करताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

Pune air pollution : वाहतूककोंडी नंतर आत पुण्यात प्रदूषणात वाढ! शहरातील 'हे' भाग सर्वाधिक प्रदूषित

न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, केवळ पालकांच्या सल्ल्यानुसार एखाद्याच्या जोडीदाराला, प्रेयसीला किंवा मित्राला लग्न करण्याचा सल्ला देणे हे आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे नाही. आरोपीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी काही कृती करून सक्रिय भूमिका बजावत असल्याचे दर्शविले पाहिजे, तरच तो गुन्हा ठरू शकतो, असे खंडपीठाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, प्रेमप्रकरण, नातेसंबंध आणि हृदयविकार आज दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. अशा परिस्थितीत, ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीला तिच्या पालकांच्या सल्ल्यानुसार किंवा इच्छेनुसार लग्न करण्याचा सल्ला देणे म्हणजे मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करने होत नाही.

Maharashtra weather update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार! असे असेल हवामान

खंडपीठाने म्हटले की, सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता, आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जात नाही कारण त्याने (अपीलकर्ता तरुण) तिला आत्महत्या करण्यास कोणतीही सक्रिय भूमिका बजावली नव्हती. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त केले.

या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, ब्रेकअप झाल्यानंतर मुलाने प्रेयसीला आई-वडिलांच्या इच्छेनुसार लग्न करण्याचा सल्ला दिला. मुलाच्या कुटुंबीयांनी त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधण्यास सुरुवात केल्यावर मुलीने नाराज होऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने तरुणाला दिलासा देण्यास नकार दिला होता. यानंतर तरुणाने सुप्रीम कोर्टात अपील दाखल करून आपल्याविरुद्ध असलेला खटला रद्द करण्याची मागणी केली होती.

Whats_app_banner
विभाग