सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देशवासीयांना मोठी भेट, आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देशवासीयांना मोठी भेट, आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देशवासीयांना मोठी भेट, आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

Oct 18, 2024 04:58 PM IST

२०२२ पासून घटनापीठांतर्गत खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. २७ सप्टेंबर २०२२ रोजी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन घटनापीठांच्या सुनावणीचे प्रथम थेट प्रक्षेपण करण्यात आले, तेव्हा ८ लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले.

सुप्रीम कोर्टात आता सर्व खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण होईल.
सुप्रीम कोर्टात आता सर्व खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण होईल.

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलत सर्व प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांचे थेट प्रक्षेपण करता येईल, असे अॅप चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आतापर्यंत केवळ घटनापीठा समोरील खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जात होते, परंतु सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने याचा विस्तार सर्व खंडपीठांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दैनंदिन सुनावणीचे नियमित थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.

कोविड महामारीनंतर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच घटनापीठासमोरील खटल्यांचे यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली होती, जी अजूनही सुरू आहे आणि आता ती सर्व न्यायालयांमध्ये लागू केली जात आहे. २७ सप्टेंबर २०२२ रोजी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन घटनापीठांच्या सुनावणीचे प्रथम थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, तेव्हा ८ लाखांहून अधिक लोकांनी ते कामकाज पाहिले होते.

तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, हे पाऊल दूरवरच्या लोकांना न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहण्याची संधी मिळेल.

खरे तर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामासाठी ओळखले जातात. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून खटल्यांच्या वाटपात प्रगती आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहेच, शिवाय जलद सुनावणीच्या व्यवस्थेतही मोठा बदल घडवून आणला आहे. पुढील महिन्यात १० नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी आपली शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर