Supreme Court: प्रॉस्टिट्यूट, कॉन्चुबायन...; सर्वोच्च न्यायालयानं नव्या हँडबुकमधून ४० शब्द वगळले
Supreme Court New Handbook: सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या नव्या हँडबुकमधून ४० शब्द वगळले आहेत.
asasDY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नव्या हँडबुकमधून प्रॉस्टिट्यूट, कॉन्चुबायन, हाऊस वाईफ यांसारखे ४० वगळले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आणि युक्तिवादांमध्ये जेंडर स्टिरियोटाइप शब्द वापरले जाणार नाहीत. एवढेच नव्हेतर, या समान अर्थ असलेल्या शब्दांचाही वापर करता येणार नाही. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी (१६ ऑगस्ट २०२३) सकाळी हँडबुक ऑफ कॉम्बेटिंग जेंडर स्टीरिओटाइप्स हे नवं हँडबुक प्रकाशित केले.
ट्रेंडिंग न्यूज
डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, "महिलांविषयी निर्णय आणि युक्तिवादांमध्ये प्रॉस्टिट्यूट, कॉन्चुबायन, हुकर, कीप, मिस्ट्रेस, स्लट यांसारख्या ४० शब्दांचा वापर करता येणार नाही. हे शब्द महिलांचा अपमान करणारे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या हँडबूकमधून हे शब्द वगळण्यात आले आहेत." हँडबुक लाँच करताना चंद्रचूड म्हणाले की, त्यात आक्षेपार्ह शब्दांची यादी आहे आणि त्याऐवजी कोणते शब्द वापरावेत हे देखील सांगितले आहे. त्यांचा उपयोग न्यायालयात बाजू मांडण्यासाठी,आदेश देण्यासाठी आणि त्यांच्या प्रती तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
"स्त्रीला व्यभिचारी म्हणणे योग्य नाही. त्याऐवजी विवाहबाह्य लैंगिक संबंधात गुंतलेली स्त्री असे म्हणता येईल. न्यायालयाच्या आदेशात अफेअर या शब्दाचा वापर विवाहबाह्य संबंधाने बदलला जाऊ शकतो. त्याचबरोबर पत्नीला कर्तव्यदक्ष पत्नी म्हणणेही अयोग्य आहे, तिला स्त्रीच म्हणावे", असेही डी. वाय चंद्रचूड म्हणाले.
"जबरदस्त बलात्कार बोलण्याऐवजी फक्त बलात्कार हा शब्द वापरावा आणि हाऊस वाईफ ऐवजी होम मेकर हा शब्द वापरावा. हँडबुकनुसार, प्रॉस्टिट्यूटऐवजी सेक्स वर्कर हा शब्द वापरला जाईल. स्लट हा शब्द आता चुकीचा आहे, तो बदलून स्त्री असा केला पाहिजे. तसेच अविवाहित आई ऐवजी फक्त आई वापरण्यात येईल आणि वेश्या हा शब्द देखील टाळून त्याजागी फक्त स्त्री वापरावी", असेही डी. वाय. चंद्रचूड म्हणाले.