मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Eknath Shinde : कोर्टातून ‘सुप्रीम’ दणका की दिलासा, मुख्यमंत्र्यांसह या १६ आमदारांचं आज काय होणार?

Eknath Shinde : कोर्टातून ‘सुप्रीम’ दणका की दिलासा, मुख्यमंत्र्यांसह या १६ आमदारांचं आज काय होणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 11, 2023 07:32 AM IST

Supreme Court Decision On Shiv Sena Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे.

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis Today Live
Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis Today Live (HT)

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis Today Live : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्व प्रकरणांवर आज सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्यासह अन्य चार न्यायाधीश हे निकाल देणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. परंतु त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस जारी केली होती. बंडखोर आमदारांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर अनेक महिने प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे आज आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देणार आहे.

शिवसेनेतील ते १६ आमदार कोणते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी-पांचपाखाडीचे आमदार, आमदार तानाजी सावंत – भूम परंडा, आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड, आमदार यामिनी जाधव – भायखळा, आमदार संदीपान भुमरे – पैठण, आमदार भरत गोगावले – महाड, आमदार संजय शिरसाठ – छत्रपती संभाजीनगर पश्चिम, आमदार लता सोनावणे – चोपडा, आमदार प्रकाश सुर्वे- मागाठाणे, आमदार बालाजी किणीकर – अंबरनाथ, आमदार बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर, आमदार अनिल बाबर – खानापूर, आमदार संजय रायमूलकर – मेहेकर, आमदार रमेश बोरनारे – वैजापूर, आमदार चिमणराव पाटील – एरोंडोल आणि आमदार महेश शिंदे – कोरेगाव

महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यापूर्वीच राज्याचे तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेकायदेशीरित्या एकनाथ शिंदे आणि भाजपला सत्तेसाठी निमंत्रण दिल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वकिलांना केला होता. तसेच सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या वकिलांची चांगलीच खरडपट्टी केली होती. त्यामुळं आजच्या निकालात सुप्रीम कोर्टाकडून राज्यपालांच्या भूमिकेवर भाष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel