मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर संपली, आता प्रतीक्षा अंतिम ‘सर्वोच्च’ निकालाची
Maharahtra political crisis
Maharahtra political crisis

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर संपली, आता प्रतीक्षा अंतिम ‘सर्वोच्च’ निकालाची

16 March 2023, 17:40 ISTShrikant Ashok Londhe

Maharahtra political crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत याचिका दाखल झाल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात अनेक अभूतपूर्व घटना घडल्या. महाआघाडीचे सरकार पायउतार होऊन भाजपच्या सोबतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेना ठाकरेंच्या हातून निसटली. राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आला, सध्याचे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप होत आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळपास ९ महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सत्तासंघर्षाबाबत याचिका दाखल झाल्यानंतरतब्बल नऊ महिन्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेआपलानिकाल राखून ठेवलाअसून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, शिवसेना आणि पक्षचिन्ह यावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारीख अधिकृत जाहीर होणार आहे.

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातीलसंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातगेल्या नऊ महिन्यापासून कोर्टात सुरु होती. मागील नऊ दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेण्यात आली. आता सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे. कोर्टात ठाकरे गट, शिंदे गट व राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद सादर करण्यात आले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर आज पूर्ण झाली. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि सध्याचं सरकार असं असंवैधानिक असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले, तर राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगून योग्य केल्याचे शिंदे गटाकडून असे सांगण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्यात आले. १४ फेब्रुवारी २०२३ पासून १२ दिवस सुनावणी झाली. त्यानंतर ठाकरे गटाने मागणी केली की, हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करावा त्यानंतर सुनावणीचे पहिले ३ दिवस प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद झाला होता. त्यानंतर मागील ९ दिवसांपासून दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. ९ महिन्यापासून सुनावणी सुरू झाली होती. आता साऱ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? काय असेल निकाल? याकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे.

 

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी संस्कृत सुभाषिताने युक्तिवादाचा शेवट केला. कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो, पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं...कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो, असे देवदत्त कामत यांनी युक्तीवादाच्या अखेरीस म्हटले.