Asaram Bapu : लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन! पण भक्तांपासून दूर राहावं लागणार; आणखी काय आहेत अटी?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaram Bapu : लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन! पण भक्तांपासून दूर राहावं लागणार; आणखी काय आहेत अटी?

Asaram Bapu : लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन! पण भक्तांपासून दूर राहावं लागणार; आणखी काय आहेत अटी?

Jan 07, 2025 01:41 PM IST

Supreme Court grants interim bail to Asaram Bapu : सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला लैंगिक अत्याचार प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना त्याला अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापू यांना मिळाला जामीन ! पण भक्तांपासून राहावे लागणार दूर; काय आहेत अटी?
लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापू यांना मिळाला जामीन ! पण भक्तांपासून राहावे लागणार दूर; काय आहेत अटी?

SC grants bail to Asaram Bapu : बलात्कार व लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. त्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्याला हा जामीन देण्यात आला आहे. जामिनाची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्याचबरोबर अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर आसारामला त्याच्या अनुयायांना भेटण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई देखील केली आहे.

आसाराम बापू यानं जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याची प्रकृती बारी नसल्याने हा जामीन मंजूर केला जावा असं त्यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले. दरम्यान, आसराम बापू याच्यावर खटला सुरूच राहणार आहे.

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला तीन पोलिसांची सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. आसाराम बापू पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, अशी अट त्याला घालून देण्यात आली आहे. यासोबतच त्याला अनुयायांना भेटण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. गुजरातमधील एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मात्र, राजस्थानमध्ये दाखल झालेल्या अशाच एका प्रकरणात आसाराम बापूला अजूनही कोठडीत राहावे लागणार आहे.

जानेवारी २०२३ मध्ये सत्र न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ च्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. गुन्ह्याच्या वेळी गांधीनगरजवळील आश्रमात राहणाऱ्या एका महिलेने आसाराम बापू यानं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

२०१३ च्या बलात्कार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आसारामच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारकडून उत्तर मागवले होते. त्यावर खंडपीठाने आसारामच्या वकिलांना सांगितले की, या मुद्द्याचे समर्थन करण्यासाठी वैद्यकीय आधार असेल तरच विचार केला जाईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर