"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाल्यास छेडछाड, असं कसं"; सुप्रीम कोर्टानं सुनावलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  "तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाल्यास छेडछाड, असं कसं"; सुप्रीम कोर्टानं सुनावलं

"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाल्यास छेडछाड, असं कसं"; सुप्रीम कोर्टानं सुनावलं

Nov 26, 2024 05:48 PM IST

Supreme Court On EVM : सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली की,“जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा EVM मध्ये छेडछाड नसते, आणि तुम्ही पराभूत झाल्यास EVM शी छेड़छाड़ होते”

सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमबाबत याचिकाकर्त्यांना सुनावलं
सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमबाबत याचिकाकर्त्यांना सुनावलं

Supreme cour tdismissed ballot paper voting petition : सुप्रीम कोर्टाने मंगळवारी देशातील निव़डणुका बॅलेट पेपरवर घेण्यासंबंधीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान जस्टिस विक्रम नाथ आणि पीबी वराळे यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की,“जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा EVM मध्ये छेड़छाड़ नसते, आणि तुम्ही पराभूत झाल्यास EVM शी छेड़छाड़ होते”

सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेल्या या याचिकेत बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करण्याबरोबरच अन्य अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये निवडणूक आयोगाकडे मागणी केली की, जर एखादा उमेदवार निवडणुकीच्य़ा दरम्यान मतदारांना पैसे, दारू किंवा त्यांना आमिष दाखवून अन्य वस्तू वाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ५ वर्षांसाठी अयोग्य घोषित केले जावे.

देशभरातील निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी. बी. वराळे यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. ईव्हीएमध्ये छेडछाड होऊ शकते, याबद्दलच्या एलॉन मस्क यांच्या विधानाचाही याचिकाकर्त्यांनी कोर्टात संदर्भ दिला. त्याचबरोबर जगातील विकसित असणाऱ्या १५०० हून अधिक देशात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होतात, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले.

याचिककर्त्यांच्या मागणीवर चंद्राबाबू नायडू आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांनी ईव्हीएमबद्दल उपस्थित केलेल्या शंकांकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. न्यायालय म्हणाले, जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी पराभूत होतात, तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड केलीये. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत. याकडे आपण कसे बघायचे?, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली.

न्यायालय म्हणाले की, काय होतंय की, जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड नसते. पण,  जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला जातो. जगापेक्षा तुम्हाला वेगळं का नकोय?, असा सवाल न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना केला.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर