सनी लिओनीच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून जमा होतात ‘या’ योजनेचे पैसे! बघा पुरावा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सनी लिओनीच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून जमा होतात ‘या’ योजनेचे पैसे! बघा पुरावा

सनी लिओनीच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून जमा होतात ‘या’ योजनेचे पैसे! बघा पुरावा

Dec 22, 2024 08:04 PM IST

छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेचा लाभ सनी लिओनीच्या नावावर घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्तीसगडसह संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाकडून याची चौकशी केली जात आहे.

सरकारी योजनेची सनी लिओनी लाभार्थी?
सरकारी योजनेची सनी लिओनी लाभार्थी?

Mahtari Vandan Yojana: छत्तीसगडमधील साय सरकारची महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या महतारी वंदन योजनेचा लाभ बस्तर येथे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिला मिळत आहे. असे आम्ही नाही तर सरकारची महतारी वंदन योजनेची वेब साइटच सांगत आहे. वेब साइटमध्ये नोंदणी क्रमांक MVY006535575 टाकल्यानंतर लाभार्थी महिलेचे नाव सनी लिओनी आणि पतीचे नान जॉनी सिंस दाखवते. 

लाभार्थ्याच्या खात्यात योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये जमा होत आहेत. हा प्रकार समोर येताच प्रशासनाने हा नोंदणी क्रमांक वेब साइटवरून हटवून लाभार्थ्याचा शोध सुरू केला आहे. बस्तर जिल्ह्यातील तालुर पंचायतमध्ये बनावट पद्धतीने महतारी वंदन योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस यांनी सांगितले की, संबंधित बँक खाते फ्रिज केले असून रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितांवर FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

वर्ष २०२३ मध्ये झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत महतारी वंदन योजनेच्या आश्वासनाचा मोठा वाटा होता. राज्यात विष्णुदेव साई सरकार स्थापन झाल्यानंतर महतारी वंदन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेचं कारण आहे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आल्याने 

छत्तीसगड सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या महतारी वंदन योजनेत सनी लिओनी आणि जॉनी सिंस यांची नावे समोर आली आहेत. खरं तर ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे या वर्षी मार्चपासून या योजनेची रक्कम सनी लिओनी नावाच्या महिलेच्या खात्यात दरमहा पाठवली जात आहे. या योजनेत सनी लिओनी आणि जॉनी सिन्स यांची नावे समोर आल्याने हा प्रकार छत्तीसगडसह देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.

छत्तीसगड सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर आम्ही https://mahtarivandan. cgstate. gov.in  तपासली असता या योजनेचा लाभार्थी महिला सनी लिओनी आहे, तर तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स असे नोंदविण्यात आले आहे. योजनेसाठी नोंदणी क्रमांक MVY006535575 नोंदणीकृत आहे. हा नोंदणी क्रमांक सादर केल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होत आहे. सविस्तर माहिती तपासली असता महिला लाभार्थी सनी लिओनीचा पत्ता बस्तरमधील तळूर येथे असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पाठवले जातात.

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल -

भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजय चंद्राकर यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराचा इन्कार केला आहे. चंद्राकर म्हणाले, "छत्तीसगडमध्ये पारंपरिक स्त्री-पुरुष नावे नाहीत, पण इथे धर्मांतरामुळे हे स्त्रीचे नाव असू शकते. याकडे बनावटगिरी म्हणून पाहू नये. या प्रकरणी काँग्रेसने म्हटले आहे की, या प्रकरणात आम्ही आधी म्हटले होते की, या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि योजनेचा पैसा भाजप नेत्यांच्या खिशात जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर