अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विलियम्सचे हे काय झाले हाल; लोक काळजीत, NASA ने दिली महत्वाची अपडेट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विलियम्सचे हे काय झाले हाल; लोक काळजीत, NASA ने दिली महत्वाची अपडेट

अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विलियम्सचे हे काय झाले हाल; लोक काळजीत, NASA ने दिली महत्वाची अपडेट

Nov 07, 2024 07:24 PM IST

Sunita Williams Health : फोटो पाहून असं वाटतं की सुनीताचं वजन लक्षणीयरीत्या कमी झालं आहे आणि तिचे गालही आत गेले आहेत. सुनिता विल्यम्सच्या तब्येतीबाबत नासाने काय म्हटले आहे जाणून घेऊया..

सुनिता विलियम्सचा नवा फोटो आला समोर
सुनिता विलियम्सचा नवा फोटो आला समोर

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार विल्मोर बुच अंतराळात अडकून अनेक महिने झाले आहेत. हे दोन्ही अंतराळवीर आठवडाभरासाठी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले होते, मात्र यानातील तांत्रिक बिघाडामुळे आता दोघेही पुढील वर्षी फेब्रुवारीमध्येच परत येऊ शकणार आहेत. दरम्यान, सुनीता विल्यम्सचे काही फोटो समोर आले, ज्यामुळे शास्त्रज्ञांसह जगभरातील लोक चिंतेत पडले आहेत. फोटो पाहून असं वाटतं की सुनीताचं वजन लक्षणीयरित्या कमी झालं असून तिचे गालही आत गेले आहेत. अंतराळातील अंतराळवीरांसाठी ही एक सामान्य समस्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असेही असू शकते की, सुनीता विल्यम्स दररोज जितक्या कॅलरीत घेत आहे, त्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करत असेल.

नासाने म्हटले - सर्व अंतराळवीरांची सुखरुप -

सुनीता विल्यम्सच्या फोटोंवरही नासाची प्रतिक्रिया समोर आली आहे. नासाच्या स्पेस ऑपरेशन मिशन डायरेक्टरेटचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील नासाच्या सर्व अंतराळवीरांची नियमित चाचणी केली जाते. त्यांची देखरेख विशेष शल्यचिकित्सक करतात. सर्व अंतराळवीरांची तब्येत चांगली आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर २०० दिवसांहून अधिक दिवस घालवलेल्या क्रू-८ च्या चार अंतराळवीरांना ५ नोव्हेंबर रोजी पृथ्वीवर परतल्यानंतर तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून ते २५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडामध्ये दाखल झाले. नासाने पुष्टी केली की सुरुवातीला एका अंतराळवीराला वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि थोड्याच वेळात सर्व क्रू मेंबर्सना देखरेखीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर अंतराळवीरांना तेथे दाखल करावे लागले. त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुच यांच्याबद्दल चिंता वाढली आहे.

सुनीताबाबत तज्ज्ञ काय म्हणाले?

नासाव्यतिरिक्त सिएटल येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनय गुप्ता यांनीही सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीवर प्रतिक्रिया दिली आहे. डेलीमेल डॉट कॉमशी बोलताना गुप्ता म्हणाले की, हे चित्र दर्शवते की हे अशा व्यक्तीचे आहे ज्याला मला वाटते की खूप जास्त उंचीवर राहिल्यामुळे, अगदी दाबलेल्या केबिनमध्येदेखील नैसर्गिक ताण येत आहे, तिचे गाल किंचितआत गेलेले दिसतात आणि जेव्हा शरीराचे एकूण वजन कमी होते तेव्हा असे सहसा होते. अंतराळवीराचे आत गेलेले गाल म्हणजे ते काही काळ कमी खात असल्याचे डॉ. गुप्ता यांनी म्हटले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर