अनेक महिने अंतराळात अडकलेली सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अनेक महिने अंतराळात अडकलेली सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल

अनेक महिने अंतराळात अडकलेली सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल

Jan 31, 2025 12:24 AM IST

Sunita Williams News: सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी आणि स्टेशनच्या बाहेरील भागाची साफसफाई करण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले.

'अनेक महिने अंतराळात अडकलेली' सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल
'अनेक महिने अंतराळात अडकलेली' सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल (via REUTERS)

Sunita Williams News: नासाच्या दोन अंतराळवीरांनी तब्बल आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून एकत्र बाहेर पडताना गुरुवारी आपला पहिला स्पेसवॉक केला. भारतीय वंशाच्या कमांडर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर आणि व्हेंटमधून बाहेर पडल्यानंतर एखादी व्यक्ति ही जिवंत राहू शकते की नाही ? याचा शोध घेण्यासाठी स्थानकाच्या देखभालीचे काम आणि बाहेरील भाग स्वच्छ करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. हे दोघेही गेल्या वर्षी जूनपासून अंतराळात स्थानकात अडकून पडले आहे.

स्पेनपासून ४२० किलोमीटर अंतराळात प्रक्षेपित होत असतांना अंतराळ वीर विल्मोर म्हणाले, आम्ही निघतो आहोत. गेल्या जूनमध्ये जेव्हा ते अंतराळ स्थानकावर पोहोचले तेव्हा हे दोघे अंतराळ स्थानकात फक्त आठवडाभर थांबणे अपेक्षित होते. पण त्यांचे अंतराळयान बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये काही बिघाड झाल्याने नासाने हे यान रिकामे पृथ्वीवर वापस आणले. त्यामुळे सुनीता आणि विल्मोर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापूर्वी पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे दोघे अंतराळ स्थानकात सर्वाधिक काळ राहिलेले अंतराळवीर झाले आहेत.

सुनीता विल्यम्स या दोन आठवड्यांपूर्वी नासाच्या आणखी एका अंतराळवीरासोबत अंतराळात गेल्या होत्या. मात्र, त्यावेळी नासाने दुसरा स्पेसवॉक पुढे ढकलला होता. त्यानंतर सुनीता यांनी गुरुवारी पुन्हा आपला स्पेस पार्टनर विल्मोर बुच सोबत स्पेसवॉक पूर्ण केला.

अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीचे केले काम

पहिल्या स्पेसवॉकदरम्यान स्टेशन कमांडर सुनीता विल्यम्स नासाच्या निक हेग यांच्यासोबत आयएसएसच्या काही प्रलंबित बाह्य दुरुस्तीची कामे करणार होत्या. जेव्हा अंतराळ यान तुर्कमेनिस्तानपासून २६० मैल अवकाशात जात असतांना अंतराळ यानातून दोघेही बाहेर पडले. यावेळी त्यांनी रेडिओवर संदेश पाठवत मी बाहेर येत असल्याचा संदेश दिला.

गेल्या उन्हाळ्यात हे दोघेही स्पेसवॉक करणार होते. मात्र, हा स्पेसवॉक देखील रद्द करण्यात आला. अंतराळवीरांच्या सूटच्या कूलिंग लूपमधून एअरलॉकमध्ये पाणी शिरल्याने अमेरिकेचा हा स्पेसवॉक रद्द करण्यात आला होता. नासाने सांगितले की, ही समस्या दूर करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर