तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या कशी होणी रिकव्हरी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या कशी होणी रिकव्हरी

तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या कशी होणी रिकव्हरी

Published Mar 19, 2025 05:49 PM IST

SunitaWilliams News : शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना परतल्यावर चालण्यात अडचण, थकवा आणि इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी दीर्घकाळ गुरुत्वाकर्षणाशिवाय राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार
पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्सला होऊ शकतात हे गंभीर आजार

Sunita Williams Return: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता आणि बुच यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर, अमेरिकेचा निक हेग आणि रशियाचा अलेक्झांडर गोर्बुनोव्ह होते. भारतीय वेळेनुसार १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी त्यांचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. नासाने या यशस्वी पुनरागमनाला दुजोरा दिला आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना चालताना त्रास होऊ शकतो, थकवा जाणवू शकतो आणि परतीच्या काळात इतर अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी जास्त काळ मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं.

स्नायू व हाडे कमकुवत -

पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे आपले स्नायू आणि हाडे मजबूत राहतात. पण अंतराळात शरीराला वजन सहन करण्याची गरज नसते. ज्यामुळे पाय, पाठ आणि मानेचे स्नायू कमकुवत होतात. याशिवाय अंतराळात हाडांवर कोणताही दबाव येत नाही, ज्यामुळे हाडांची घनता कमी होते आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. शास्त्रज्ञांच्या मते, हाडांची घनता दर महिन्याला सुमारे १ टक्क्यांनी कमी होऊ शकते. यामुळे अंतराळात परतल्यानंतर अंतराळवीरांना उभे राहण्यास, चालण्यात आणि धावण्यास त्रास होऊ शकतो. पूर्ण ताकद परत मिळवण्यासाठी पॉवर ट्रेनिंग, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी युक्त आहारही काही महिन्यांच्या थेरपीसाठी दिला जाऊ शकतो.

वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम -

अंतराळात वरच्या दिशेने रक्त प्रवाहामुळे होते, ज्यामुळे चेहऱ्याला सूज येण्यासह अनुनासिक रक्तसंचय होण्याची शक्यता वाढते. ही स्थिती एखाद्या व्यक्तीच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. अवकाशाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे नाकाभोवती थर जमा होतात आणि हळूहळू गंध ओळखण्याची क्षमता कमी होते.

रक्ताची कमतरता -

ओटावा विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, अंतराळात राहण्यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. या संशोधनात १४ अंतराळवीरांचा अभ्यास करण्यात आला, ज्यात असे दिसून आले की, अंतराळात राहिल्याने शरीरातील लाल रक्तपेशी नष्ट होत आहेत. ही कमतरता संपूर्ण मोहिमेत कायम राहिली आणि जेव्हा ते पृथ्वीवर परतले तेव्हा अशक्तपणा आणि थकवा जाणवला. लाल रक्तपेशींची संख्या कमी असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहावरही परिणाम होतो, ज्यामुळे अशक्तपणा आणि सुस्ती येते.

रक्तदाबाची समस्या

अंतराळात रक्तप्रव डोके आणि छातीकडे जाते, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येते आणि पायात द्रव पदार्थ नसल्यामुळे ते आकुंचन पावतात. जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परत येतात तेव्हा गुरुत्वाकर्षण रक्त खाली खेचते, ज्यामुळे रक्तदाब अचानक कमी होतो आणि एखाद्या व्यक्तीला चक्कर येते किंवा बेशुद्ध वाटू शकते.

पृथ्वीवर परतल्यानंतर पुनर्प्राप्ती कशी होईल?

या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नासा अंतराळवीरांना विशेष प्रशिक्षण आणि पुनर्वसन सेवा पुरवते. याशिवाय त्यांना खास डाएट आणि एक्सरसाइजही दिला जातो.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर