मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Election Commissioners : ज्ञानेश कुमार आणि सुखवीर सिंह संधू देशाचे नवे निवडणूक आयुक्‍त

Election Commissioners : ज्ञानेश कुमार आणि सुखवीर सिंह संधू देशाचे नवे निवडणूक आयुक्‍त

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 14, 2024 04:05 PM IST

Election Commission commissioners : ज्ञानेश कुमार (gyanesh kumar) आणि सुखवीर सिंह संधू नवीन निवडणूक आयुक्त असतील. निवड समितीने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.

दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती
दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

देशाला दोन नवे निवडणूक आयुक्‍त मिळाले आहेत. ज्ञानेश कुमार (gyanesh  kumar) आणि सुखवीर सिंह संधू (Sukhbir sandhu) नवीन निवडणूक आयुक्त असतील. निवड समितीने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. विरोधी नेते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. गुरुवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेखाली निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेसाठी गठित केलेल्या समितीची बैठक पार पडली. यामध्ये गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या निवड समितीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षेनेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश होता.  दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची अधिसूचना सायंकाळपर्यंत जारी केली जाऊ शकते.

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत समावेश असणाऱ्या अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, कमेटीमध्ये सरकारचे प्रतिनिधी बहुमतात आहेत. मी काहीही म्हटले तरी सरकारला जे पाहिजे तसेच होईल. अरुण गोयल यांच्या नियुक्तीवेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, त्यांची नियुक्ती विद्युत वेगाने झाली आहे. आणि ते त्याच वेगाने पायउतारही झाले. अधीर रंजन चौधरी यांनी दोन्ही नवनियुक्त निवडणूक आयुक्‍तांच्या नावांची घोषणा करताना म्हटले की, मी या निवडीवर असहमती व्यक्त केली आहे. तसेच निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

चौधरी यांनी म्हटले की, मी लॉ मिनिस्ट्रीतून आधीच शॉर्ट लिस्टेड नावाची यादी मागवली होती. मात्र मिळाली नाही. लिस्‍ट आधी मिळाली असती तर आम्ही चौकशी करू शकलो असतो. जी यादी आधी दिली होती त्यामध्ये २१२ नावे होती. अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, मी रात्रीच दिल्लीत आलो असून दुपारी पंतप्रधानांनी बैठक बोलावली. अशात २१२ नावांची छाननी कशी करणार.

कोण आहेत नवी निवडणूक आयुक्‍त?
निवडणूक आयुक्‍त निवडीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंह संधू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ज्ञानेश कुमार केरळ केडरचे वरिष्‍ठ अधिकारी आहेत. तर सुखिविंदर सिंह सधू पंजाब केडरचे आहेत. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्‍त पदाचा राजीनामा दिला होता. सांगितले जात आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी त्यांचे अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. 

IPL_Entry_Point

विभाग