मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  “काँग्रेसनेच अदानींना जमीन, बंदर देऊन मोठं केलं”, भाजपच्या बड्या नेत्याने संपूर्ण लेखाजोखाच मांडला

“काँग्रेसनेच अदानींना जमीन, बंदर देऊन मोठं केलं”, भाजपच्या बड्या नेत्याने संपूर्ण लेखाजोखाच मांडला

Apr 08, 2023 11:36 PM IST

Gautam adani : गौतम अदानी यांना २० हजार कोटी रुपये कोणी दिले, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रान उठवले असताना आता भाजपच्या राज्यातील बड्या नेत्याने काँग्रेसवरच आरोप केले आहेत.

गौतम अदानी
गौतम अदानी

गौतम अदानी यांना २० हजार कोटी रुपये कोणी दिले, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रान उठवले असताना आता भाजपचे राज्यातील बडे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवरच आरोप केले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, अदानींना मोठं करण्याचं काम काँग्रेसनेच केलं आहे. काँग्रेसचे चिमणभाई पटेल मुख्यमंत्री असताना त्यांनी १९९३ मध्ये गुजरातमधील कच्छमध्ये अदानींना केवळ १० पैसे प्रतिमीटर दराने शेकडो एकर जमीन दिली. छबीलदास मेहता हेही काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मुंद्रा बंदर अदानींना दिलं होते.

ट्रेंडिंग न्यूज

मुनगंटीवार यांनी म्हटले की, राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गौतम अदानी यांच्याबरोबर ४८ हजार कोटींचा करार केला आहे. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अदानींना हजारो कोटी रुपये दिले. म्हणजे काँग्रेस जेव्हा मदत करते तेव्हा सगळं कसं सुरुळीत मात्र जर कायद्याच्या चौकटीत राहून एखादं कंत्राट अदानीला मिळालं तर त्यात घोटाळा म्हणणं अभ्यासाचा विषय आहे.

उद्योगपती गौतम अदाणींवर दुसऱ्या देशाच्या एका कंपनीने आरोप केले असून त्याची न्यायालयाकडून चौकशी सुरू आहे. याचा अहवाल अल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल. त्यामध्ये काही चुका असतील, तर त्यावर कायदेशीर कारवाई होईलच. यामध्ये कोणाचेही दुमत नाही.

 

त्यामुळे शरद पवार यांचे भाष्य अतिशय बोलकं आहे. सुप्रीम कोर्टाची चौकशी सुरू असताना दुसरी चौकशी करण्याची आवश्यकता काय आहे?” असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत हे विधान केलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४