IAS Officer Success Story: बॉलिवूड चित्रपट ‘ओम शांती ओम’ मधील एक प्रसिद्ध डायलॉग आहे. ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’. जर एकदा व्यक्ती ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत व प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर यश त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. केवळ ते यश मिळवण्यासाठी दुर्दम्य आशावाद व जबर इच्छाशक्ती अंगी हवी. कोणीतरी म्हटलेच आहे की, प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नसतो. कठीणातील कठीण परिस्थितीत ध्येयवेडे तरुण आपल्या स्वप्नाला गवसणी घालतातच आज आम्ही तुम्हाला अशीच एक प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत, ही कहाणी आहे आएएएस अधिकारी श्रीनाथ यांची ज्यांची रेल्वेचा मोफत वायफाय वापरून आपल्या चौथ्या प्रयत्नात आयएएस परीक्षा पास केली व देशभरातील तरुणांचे प्रेरणास्थान बनले.
IAS श्रीनाथ के. केरळ राज्यातील मुन्नार जिल्ह्यामधील एका गावात राहत होते. त्यांच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने व त्यांचाही विवाह झाल्याने ते कुटूंबाला हातभार लावण्यासाठी छोटीमोटी कामे करू लागले. त्यानंतर ते एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवर कुलीचे काम करण्यासाठी गेले. ते रेल्वे स्टेशनवरील नोंदणीकृत हमाल होते. मात्र २०१८ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्यांना अनुभव आला की, हमाली करून मिळालेल्या पैशातून ते आपल्या कुटूंबाला चांगली जीवनशैली देऊ शकत नाही तसेच मुलीचे चांगले संगोपन व शिक्षण करू शकणार नाहीत. त्यांना प्रतिदिन ४०० ते ५०० रुपये रोजगार मिळत होता. चांगल्या कमाईसाठी त्यांनी रात्रीही हमालीचे काम सुरू ठेवले. जेव्हा त्यांना वाटले की, कितीही मेहनत केली तरी हमालीतून आपल्या कुटूंबाचे भागणार नाही, त्यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करत तशी तयारी सुरू केली.
२०१८ मध्ये त्यांनी केरळ लोकसेवा आय़ोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली, मात्र आर्थिक तंगीमुळे त्यांना माहिती होते की, ते महागड्या ट्युशन क्लासेसची फी देऊ शकणार नाहीत. मात्र त्यांनी हार मानली नाही व एक वेगळाच मार्ग शोधून काढला.
२०१६ मध्ये भारत सरकारने डिजिटल इंडिय़ा मोहीम सुरू केली. त्या अंतर्गत देशातील मोठ्या रेल्वे स्टेशनवर रेलटेल आणि गुगलच्या माध्यमातून मोफत वाय-फाय लाँच केले गेले. फ्री WI-FI च्या माध्यमातून त्यांनी परीक्षेचे व्हिडिओ डाउनलोड केले व काम करत करत KPSC परीक्षेची तयारी केली. श्रीनाथ यांनी आपला पैसा केवळ एक मेमरी कार्ड, स्मार्ट फोन आणि एक जोडी ईयर फोनसाठी खर्च केले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. याबद्दल २०१८ मध्ये केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी श्रीनाथचे अभिनंदन केले होते. त्यांची प्रेरणादायी कहाणी गुगलनेही शेअर केली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी KPSC परीक्षेत चांगली रँक मिळवली. मात्र ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांचे ध्येय होते IAS अधिकारी बनने. त्यामुळे त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरूच ठेवली.
श्रीनाथ यांनी २०१८ मध्ये पहिल्या प्रयत्नात केरळ लोक सेवा आयोगाची परीक्षा पास केली. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून त्यांना आपले गाव व परिसराचा विकास करायचा होता. UPSC परीक्षा पास करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत केली मात्र परिस्थितीसमोर हार मानली नाही. हमाली सोडली असती तर त्यांच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली असती. त्यामुळे कुलीची नोकरी करत त्यांना चौथ्या प्रयत्नात सिविल सर्विस परीक्षा पास केली. श्रीनाथ यांनी यूपीएससीचे चार अटेंप्ट दिले होते. पहिल्या ३ प्रयत्नात ते सफल होऊ शकले नाहीत. मात्र २०२२ मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करत आयएएस अधिकारी बनले. श्रीनाथ यांची ही कहाणी अन्य तरुणांसमोर एक आदर्श उदहरण आहे, ज्यांना समान संधी मिळत नाहीत, मात्र कठीण संघर्ष करून यश मिळवतात.
श्रीनाथ आपली गरीब परिस्थितीमुळे कोचिंग क्लासची महागडी फी देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणतेही कोचिंग न घेता सेल्फ स्टडीच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी केली. ज्या स्टेशनवर ते हमाली करत होते तेथेच रिकाम्या वेळेत स्टेशनमधील फ्री वायफायचा वापर करत अभ्यास करत होते. तेथेच बसून ते रात्रंदिवस आपल्या नोट्स तयार करत होते. त्यांची घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती की, ते स्टडी मटेरिअलही विकत घेऊ शकत नव्हते.
श्रीनाथ के यांनी चौथ्या प्रयत्नात २०२२ युपीएससी परीक्षा पास केली. त्यानंतर मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lal bahadur shastri national administrative academy) येथे २ वर्षाचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण करून ते आयएएस सेवेत रुजू झाले आहेत. ते सध्या प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी पदावर असून त्यांना केरळ केडर मिळाले आहे.
संबंधित बातम्या