शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो हे आम्ही भारतात दाखवून दिलं; यूएनमध्ये पंतप्रधान मोदींचे विधान-success of humanitylies in collective strength pm modi at summit of future at unga ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो हे आम्ही भारतात दाखवून दिलं; यूएनमध्ये पंतप्रधान मोदींचे विधान

शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो हे आम्ही भारतात दाखवून दिलं; यूएनमध्ये पंतप्रधान मोदींचे विधान

Sep 23, 2024 11:19 PM IST

Narendra Modi : सायबर, समुद्र आणि अंतराळ यांसारख्या नव्या क्षेत्रांतील संघर्ष आणि दहशतवादाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला आणि या मुद्द्यांवर जागतिक पातळीवरील कारवाई जागतिक महत्त्वाकांक्षेच्या अनुषंगाने व्हायला हवी, असेही मोदी म्हणाले.

यूएनमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी
यूएनमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी (AFP)

आम्ही भारतातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. यशाचा हा अनुभव जगासोबत शेअर करण्यास आम्ही तयार आहोत. मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमधील सुधारणा महत्त्वाच्या आहेत. जगात तीन ठिकाणी युद्धाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते शनिवारी (२१ सप्टेंबर) अमेरिकेत दाखल झाले. यादरम्यान त्यांनी जो बायडेन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. आज (२३ सप्टेंबर) युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या ७९ व्या सत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी जागतिक दहशतवाद आणि शांततेच्या मुद्द्यावर आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. 

मानवतेचे यश रणांगणात नाही तर सामूहिक शक्तीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना केले. इस्रायल-हमास युद्ध आणि युक्रेन संकटासह जगभरात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या 'फ्युचर समिट'मध्ये हे वक्तव्य केले. शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदाय जगाच्या भवितव्यावर चर्चा करत असतो, तेव्हा मानवकेंद्रित दृष्टिकोनाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.

कोणत्याही विशिष्ट लढ्याचे नाव न घेता ते म्हणाले, 'मानवतेचे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात आहे, रणांगणावर नाही. शाश्वत विकासाला प्राधान्य देताना मानवकल्याण, अन्न आणि आरोग्य सुरक्षेचीही खात्री केली पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. सायबर, समुद्र आणि अंतराळ अशा नव्या क्षेत्रांतील संघर्ष आणि दहशतवादाचा मुद्दा त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला आणि या मुद्द्यांवर जागतिक कारवाई जागतिक महत्त्वाकांक्षेच्या अनुषंगाने व्हायला हवी, असे सांगितले.

दहशतवाद शांतता व सुरक्षेसाठी धोका -

दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून शाश्वत विकास कसा यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. असेही पंतप्रधान म्हणाले.

ग्लोबल साऊथ' हा शब्द सामान्यत: आर्थिकदृष्ट्या कमी विकसित देश किंवा विकसनशील देशांसाठी वापरला जातो. पंतप्रधान मोदी यांनी जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले. सध्या तीन आघाड्यांवर मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये द्विपक्षीय संघर्ष सुरू असला तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या इस्रायल-हमास युद्ध आणि युक्रेन-रशिया युद्ध. त्यात आता इस्रायल-लेबनॉन युद्धाचीही भर पडली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील संकट पुन्हा गडद झाले असून जागतिक शांतता संकटात सापडली आहे.

Whats_app_banner
विभाग