COVID-19 Death in India : भारतासह जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. या साथीच्या आजारामुळे अनेकांनी जीव गमावला. २०२ मध्ये देशात या आजारामुळे तब्बल ११.९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. जो २०१९ च्या तुलनेत १७ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात पुढे आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची ही संख्या सरकारने जारी केलेल्या आकडेवारी पेक्षा ८ पटीने जास्त आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजापेक्षा १.५ पट जास्त आहे, असे यूकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले.
भारतातील कोरोना काळातील मृत्यूबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. या संशोधनात ७.६५ लाखांहून अधिक व्यक्तींच्या माहितीचा वापर करण्यात आला. अभ्यासानुसार २०१९ ते २०२० या कालावधीत लिंग आणि सामाजिक गटानुसार, जन्म व आयुर्मानात होणाऱ्या बदलांचा अंदाज देखील वर्तवला गेला आहे,
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ५ (NFHS-5) मधून डेटा गोळा करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांचे आयुर्मान ३.१ वर्षांनी घसरले आहे. तर पुरुषांमध्ये ते २.१ वर्षांनी घसरले. आरोग्यसेवा आणि घरांमध्ये संसाधनांचे वितरण यामधील देखील लैंगिक असमानता हे या मागे प्रमुख कारण असल्याचं या संशोधनात मानलं जात आहे.
गोळा करण्यात आलेली माहिती ही उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये भिन्न आहेत. साथीच्या रोगाच्या काळात स्त्रियांपेक्षा पुरुषांचे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते, असे संशोधकांनी सायन्स ॲडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
समाजातील विविध घटकांचा अभ्यास केल्यावर संशोधकांना असे आढळले की हिंदूंचे आयुर्मान १.३ वर्षांनी कमी झाले आहे, तर मुस्लिम आणि अनुसूचित जमातींनी त्यांच्या आयुर्मानात ५.४ वर्षे ते ४.१ वर्षांची घट झाली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे रिसर्च फेलो, प्रथम लेखक आशिष गुप्ता म्हणाले, “मागासवर्गीय गटाचे आयुर्मान आधीच कमी होते. कोरोनामुळे देशातील भीषण परिस्थिती पुढे आली. यामुळे देशातील उच्च गट आणि कनिष्ठ गटातील दरी ही आणखी वाढत गेली. भारतातील मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरूणांची आणि वृद्ध नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक होती. ते म्हणाले की, कोविड-१९ बाधित काही भागातील मुलांचे देखील सर्वाधिक मृत्यू झाले. साथीच्या रोगाचा आणि लॉकडाऊनचा अप्रत्यक्ष परिणाम, बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य सेवांच्या अपुऱ्या सोई हे देखील मृत्यूंची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक रिद्धी कश्यप म्हणाले, लोकसंख्याशास्त्रीय व आरोग्य सर्वेक्षण डेटाचा वापर करून, कोणत्या गटातील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. व देशातील असमानतेवर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट या संशोधनाचे होते. “कोविड-१९ या महामारीपूर्व लिंग विषमतेचे आरोग्यावर होणारे परिणाम हे आणखी वाढल्याचे आढळून आले, असे देखील रिद्धी कश्यप म्हणाले.
संबंधित बातम्या