मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दारू प्यायल्यानंतर लोक इंग्रजीत का बोलतात?; अभ्यासातून उलगडलं मोठं गुपित
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

दारू प्यायल्यानंतर लोक इंग्रजीत का बोलतात?; अभ्यासातून उलगडलं मोठं गुपित

25 January 2023, 19:22 ISTShrikant Ashok Londhe

दारूचे दोन घोट पोटात गेल्यानंतर अनेकांची पोपटपंची सुरू होते. काही जण तर अस्सलिखित इंग्रजीत बोलू लागतात, असे का होते, याचा शोध एका अभ्यासात समोर आला आहे.

दारू पिल्यानंतर लोक अनेकदा असे वर्तन करतात जे ड्रिंक न करणाऱ्यांना अजब वाटते. अल्कोहॉल पोटात गेल्यानंतर लोक मनातील सर्व काही बोलून दाखवतात. तसेच ज्यादा भावनिक होतात. काहींचे मन हलके होते काही जण इंग्रजी फ्लूएंटली बोलतात. एका स्टडीमध्येही गोष्ट समोर आली आहे, की ड्रिंक घेतल्यानंतर लोकांची भाषा बाबतीतील भीती कमी होते व ते दुसरी भाषा सहजरित्या बोलतात. काही अभ्यासगटात हा सुद्धा दावा केला आहे की, दारू पिल्ल्यानंतर सामाजिक भान कमी होते.

ट्रेंडिंग न्यूज

रिचर्सचाइंट्रेस्टिंगरिजल्ट-

लिवरपूल यूनिवर्सिटी आणि किंग्स कॉलेज लंडनमध्ये सेकंड लँग्वेज आणि दारूच्या कनेक्शनवर एक स्टडी झाली आहे. यामध्ये समोर आले आहे की, जे लोक दोन भाषांचे ज्ञानजवळ बागळतात ते थोडी जरी दारू प्यायले तरी दुसऱ्या भाषेत सहजरित्या बोलू शकतात. स्टडीमध्ये ५० लोकांनी सहभाग घेतला होता. इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की, या लोकांना सांगितले नव्हते की, त्यांना काय प्यायला दिले जात आहे. तसेच यांचे निरीक्षण करणाऱ्या लोकांनाही माहिती नव्हते की, कोणी दारू प्यायली आहे व कोणी नाही. ज्या लोकांनी थोडी दारू प्यायली होती त्यांना दुसरी भाषा बोलण्यास चांगली रेटींग मिळाली.


वैज्ञानिक या निर्णयापर्यंत पोहोचले की, कदाचित थोड्या प्रमाणात दारू प्रननसिएशन आणि दूसरी भाषा शिकण्याची क्षमता प्रभावित करते. मात्र अधिक दारू प्यायल्याचे परिणाम उलट होते. त्यामुळे जीभ लटपटू शकते आणि मेंदूही व्यवस्थित काम करत नाही. असेही मानले जाते की, दारू तुमची भीती कमी करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. दरम्यान वैज्ञानिकांनी हे सुद्धा मानले की, अंतिम कनक्लूजन देण्यापूर्वी काही आणखी प्रयोगांची आवश्यकता आहे.