Bengaluru news : बेंगळुरूच्या आदर्श नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी वसतिगृहात उंदीर प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली. या औषधांमुळे १९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पश्चिम बेंगळुरूचे पोलिस उपायुक्त एस. गिरीश यांनी या बाबत दिलेल्या माहितीनुसार आदर्श नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात रविवारी उंदीर मारण्याचे औषध फवारण्यात आले होते. या विषारी औषधामुळे एकूण १९ मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. या घटनेमुळे खळबळ उडाली. त्यांना तातडीने वसतिगृहातील इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. १९ पैकी तीन विद्यार्थी गंभीर आजारी असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार असून त्यांची प्रकृती ही चितांजनक आहे. तर जयन वर्गीस, दिलेश आणि जो मोन हे तीन विद्यार्थी गंभीर आजारी आहेत आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले करण्यात आले आहे. उंदीराचे विष शिंपडणाऱ्या वसतिगृह व्यवस्थापन कर्मचाऱ्यावर कलम २८६ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श नर्सिंग कॉलेजमध्ये वसतिगृहात उंदरांचा मुलांना त्रास होत होता. यामुळे वसतिगृह प्रशासनाने उंदीरांना प्रतिबंध करणारे औषध फवारले. यावेळी मुलांना काही वेळ खोली बाहेर राहण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. हे औषध विषारी असल्याने याचा त्रास मुलांना होऊ लागला. औषधाच्या तीव्र व उग्र वासामुळे काही मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अचानक मुलांना त्रास होऊ लागल्याने वासतिगृहातील मुले घाबरले. त्यांनी याची माहिती तातडीने प्रशासनाला दिली. तो पर्यंत मुलांचा त्रास वाढू लागला होता. यामुळे मुलांनी व कर्मचाऱ्यांनी तसेच वासतिगृहाबाहेरील काही नागरिकांनी तातडीने मुलांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. १९ मुलांना त्रास झाला होता. त्यातील काही मुलांची प्रकृती स्थिर आहे. तर तिघांची प्रकृती ही गंभीर झाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.