Viral News: शाळेत असताना अनेकांनी सुट्टी मिळवण्यासाठी आपल्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून विनंती केली असेल. असेच एक पत्र सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एका विद्यार्थ्याने सुट्टी मिळवण्यासाठी आपल्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्याने लिहिलेले पत्र वाचून अनेकांना हसू आवरता येणार नाही. या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रामध्ये नेमके काय लिहिले आहे, हे जाणून घेऊयात.
काही मुले अशी असतात की, त्यांना कोणाचीच भिती वाटत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र इयत्ता सातवीच्या मुलाने लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकतो, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही कारणास्तव त्याला शाळेतून सुट्टी हवी आहे. यासाठी त्याने मुख्याध्यापकांना सुट्टीसाठी विनंती करण्याऐवजी थेट येणार नसल्याचे पत्रात लिहिले आहे. राकेश असे या विद्यार्थ्याचे नाव आहे, असे पत्रातून समजत आहे. डिअर मॅडम, मी येणार नाही, नाही येणार म्हणजे नाही येणार. येणारच नाही मी!' असे त्याने पत्रात लिहिले आहे. हे पत्र गेल्या महिन्यातील असल्याचे दिसत आहे. पत्राच्या शेवटी विद्यार्थ्याने २९ जुलै २०२४ अशी तारीख टाकली आहे.
rolex_0064 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक केले असून यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुरू आहेत. एका युजरने या पोस्टवर कमेंट लिहिताना असे म्हटले आहे की, 'हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पत्र आहे. काय लिहिले आहे, ते सोडा त्याचे हस्ताक्षर बधून हस्ताक्षर त्याला आणखी एक दिवसाची अतिरिक्त सुट्टी देण्यात यावी'. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'या मुलाचे पत्र पाहून मुख्याध्यापकांना मोठा धक्का बसला आहे. ते अजूनही या धक्क्यातून सावरले नसल्याची गुप्त माहिती मिळाली आहे.' आणखी एका विद्यार्थ्याने म्हटले आहे की, मी आजपर्यंत असे सभ्य पत्र लिहिलेले नाही. हे पत्र वाचून मुख्याध्यापकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे एकाने लिहिले आहे.
यापूर्वी इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलाने भारतीय लष्कराला पत्र लिहिले. वायनाड भूस्खलनानंतर भारतीय लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून मदत आणि बचावकार्य केले. भारतीय लष्कराच्या कामाने हा विद्यार्थी इतका प्रवाभित झाला की, त्याने लष्कराला पत्र लिहून मोठा झाल्यावर सैनात भरती होण्याचे वचन दिले आणि त्यांच्या कामाचे कौतूक केले. या विद्यार्थ्याने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या विद्यार्थ्याच्या पत्रावर भारतीय लष्कराने देखील प्रतिक्रिया दिली.