Taiwan Earthquake update : तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यानंतर त्सुनामीचा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २५ वर्षातील तैवानमध्ये आलेला हा भूकंप सर्वात शक्तिशाली मानला जात आहे. या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली. वृत्तसंस्था रॉयटर्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, तीव्र भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून या भूकंपानंतर लगेचच जपानमध्ये त्सुनामी इशारा देण्यात आला आहे.
भूकंपामुळे तैवानमध्ये जीवित वा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले आहे की नाही याची माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. जपान हवामान संस्थेने ३ मीटर (९,८ फूट) पर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. तीव्र भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर लगेचच ओकिनावाच्या दक्षिणेकडील प्रीफेक्चरजवळील किनारपट्टीच्या भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भूकंपाने तैवानच्या पूर्वेकडील हुआलियन शहरातील इमारतींचा कोसळल्या आहेत. तर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तैपेईमध्येही मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. राजधानीपासून बेटाच्या दुसऱ्या बाजूला सकाळी ७:५८ वाजता भूकंप झाला, भूकंपमापकावर याची नोंद ७.२ रिश्टर नोंदवल्या गेली.
तैवानमध्ये गेल्या २५ वर्षात आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:५८ वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता ७.४ मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्वेला हुआलियन शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने या घटनेची तीव्रता रिश्टर स्केलवर ७२ इतकी नोंदवली आहे.
तैवानच्या हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले की १९९९ नंतर आलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. भूकंपानंतर सुमारे एक तासानंतर बुधवारी बाजार उघडले तेव्हा तैवानचा Taiex निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला. ग्रीनबॅकच्या तुलनेत स्थानिक डॉलर ०.१ टक्क्याने वधारला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज कार्यालये आणि शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, चीन आणि तैवानच्या काही किनारपट्टीवर १ ते ३ मीटर उंचीच्या सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. चिनी सोशल प्लॅटफॉर्म बीबोवरील लोकांनी सांगितले की त्यांना शांघाय आणि ग्वांगडोंगसह संपूर्ण चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.