केरळमधील कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिगची अंगावर काटा आणणारी घटना घडली. या प्रकरणी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजमधील तीन ज्युनिअर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ विद्यार्थ्यांना आधी नग्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचे फोटो काढण्यात आले.
गेल्या तीन महिन्यांपासून या तीन विद्यार्थ्याची रॅगिंग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांनी रँगिग करत ज्युनिअर विद्यार्थ्यांना नग्न करत त्यांच्या प्रायव्हेट पार्टला डम्बल लटकवले. या घटनेमुळे खळबळ उडाली.
तक्रारीनुसार, वेटलिफ्टिंगच्या डम्बलने त्यांना मारहाण करण्यात आली. सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांकडून दारू खरेदीसाठी नियमित पैसे मागत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ आरोपी विद्यार्थ्यांनी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना विवस्त्र करून उभे केले. त्यानंतर आरोपींनी तीन विद्यार्थ्यांच्या गुप्तांगाला डम्बल्स लटकावले. पीडितांना तीक्ष्ण वस्तूंनी दुखापत केली गेली. ज्यामध्ये कंपास बॉक्समधील टोकदार वस्तूंना शरीरावर जखमा केल्या. यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या जखमांवर लोशन व बाम लावण्यात आले. हे सिनिअर्स पीडित विद्यार्थ्यांना नेहमी रविवारी दारूसाठी पैसेही मागायचे.
कनिष्ठ विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून रॅगिंग सुरू होते. राहुल राज, एनएस जीवा, एनपी विवेक, रिगिल जीत आणि सॅम्युअल जॉन्सन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (१), ३०८ (२), ३५१ (१) आणि केरळ रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या